कोल्हापूर :
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना यांना डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७१व्या वार्षिक अधिवेशनाच्या उदघाटन समारंभात ‘एग्रीकल्चर सेक्शन’मधील “फर्स्ट रिसर्च पेपर अवॉर्ड” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कै. के. एस. काळे स्मृती पुरस्कार म्हणून दिला आहे. हा पुरस्कार राज्याचे माजी अर्थमंत्री व आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते श्रीशैल हेगान्ना व कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांनी स्वीकारला.
श्रीशैल्य हेगन्ना यांनी ‘बेनिफिट्स ऑफ सबसरफेस ड्रेनेज टेक्नॉलॉजी फॉर सॉईल सॅलिडिटी कंट्रोल सस्टेनबिलिटी ऑफ एग्रीकल्चर अँड अब सोल्युट कॉन्ट्रीब्युशन ऑफ ड्रेनेज इन शुगर केन फार्म इन्कम’ या विषयावर शोध निबंध सादर केला होता. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली दहा वर्षे क्षारपड जमीन सुधारण्याचे कार्य उत्कृष्ट पद्धतीने सुरू असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा शोध निबंध त्यांनी सादर केला आहे. या पुरस्कारामुळे कारखान्याच्या नांवलौकिकात भर पडली आहे.
या पुरस्कार वितरण प्रसंगी माजी मंत्री राजेश टोपे, डीएसटीएचे प्रेसिडेंट सोहम शिरगावकर, मांजरा साखर कारखान्याचे प्रमुख दिलीप देशमुख, व्हिएसआयचे महासंचालक संभाजीराव कडू-पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्यासह श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक इंद्रजीत पाटील, प्रमोद पाटील, कार्यकारी संचालक संजीव देसाई, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, प्रोडक्शन मॅनेजर एम. एस. जाधव, क्षारपड सुधार योजनेचे प्रोजेक्ट इंजिनियर कीर्तीवर्धन मरजे, कु. रेवती हेगन्ना आदी उपस्थित होते.
——————————
श्रीशैल्य हेगान्ना यांना ॲग्रीकल्चर सेक्शनमधील फर्स्ट रिसर्च अवॉर्ड प्रदान
Mumbai
overcast clouds
28.8
°
C
28.8
°
28.8
°
77 %
7.5kmh
96 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°

