Homeशैक्षणिक - उद्योग जिओने OTT-Pass ची व्याप्ती वाढवली

जिओने OTT-Pass ची व्याप्ती वाढवली

• 550 रुपयांत 3 महिने, 2,000 रुपयांत वर्षभर मनोरंजन
कोल्हापूर :
चित्रपट, वेब सिरीज, लाइव्ह स्पोर्ट्स आणि टीव्हीचा आनंद घेणाऱ्या जिओ ग्राहकांसाठी आता दीर्घ मुदतीचे OTT-Pass उपलब्ध होणार आहेत. कंपनीने 550 रुपयांचा 84 दिवसांचा आणि 2,000 रुपयांचा 365 दिवसांचा असे दोन नवीन पास सादर केले आहेत.
यापूर्वी उपलब्ध असलेल्या 200 रुपयांच्या पासची वैधता 28 दिवसांची आहे. या तिन्ही पासमध्ये हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड 5G, 15 प्रीमियम OTT ॲप्स तसेच JioTV वरील 1,000 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस मिळणार आहे. नवीन OTT-Pass हे एक वर्षाच्या वैधतेचा सक्रिय बेस प्लॅन असलेल्या ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. व्हॉइस-ओन्ली प्लॅन्स यामध्ये समाविष्ट नाहीत.
दीर्घ मुदतीचा पास घेतल्यास ग्राहकांचा खर्चही कमी होतो. यापूर्वी 200 रुपयांचा 28 दिवसांचा पास तीन वेळा घेतल्यास 84 दिवसांसाठी ग्राहकांना 600 रुपये खर्च करावे लागत होते. मात्र, आता 84 दिवसांचा नवीन पास 550 रुपयांत उपलब्ध असल्याने ग्राहकांची थेट 50 रुपयांची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे, वर्षभरासाठी पास घेण्यासाठी आता 2,400 रुपयांऐवजी केवळ 2,000 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच ग्राहकांची 400 रुपयांची बचत होणार आहे. पासच्या कालावधीनुसार डेटा सुविधेतही वाढ करण्यात आली आहे. 200 रुपयांच्या पासमध्ये 30GB, 550 रुपयांच्या पासमध्ये 90GB, तर 2,000 रुपयांच्या वार्षिक पासमध्ये 365GB हाय-स्पीड डेटा मिळेल.
या OTT पॅकेजमध्ये YouTube Premium, JioHotstar Mobile + Hollywood आणि Amazon Prime यांचा समावेश आहे. 550 रुपये आणि 2,000 रुपयांच्या पासमध्ये Amazon Prime Lite सदस्यत्व, तर 200 रुपयांच्या पासमध्ये Amazon Prime Video Mobile Edition उपलब्ध असेल. याशिवाय ग्राहकांना SonyLIV, ZEE5, Lionsgate Play, discovery+, Sun NXT, FanCode, Hoichoi, Chaupal, Planet Marathi, Kanchha Lannka, TimesPlay आणि Tarang Plus यांचा ॲक्सेस मिळणार आहे.
JioTV वर 1,000 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्सही पाहता येणार आहेत. यामध्ये Star Plus HD, Colors HD, SET HD, Sun TV HD, Discovery आणि Cartoon Network यांसारख्या लोकप्रिय चॅनेल्सचा समावेश आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या पॅकेजच्या माध्यमातून ग्राहकांना दरमहा 1,500 रुपयांहून अधिक मूल्याचे मनोरंजन लाभ मिळतील.
नवीन 550 रुपये आणि 2,000 रुपये किमतीचे OTT-Pass 7 ऑगस्टपासून MyJio ॲप, जिओची वेबसाइट आणि अधिकृत रिटेल आउटलेट्सवर उपलब्ध झाले आहेत.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.8 ° C
28.8 °
28.8 °
77 %
7.5kmh
96 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page