कोल्हापूर :
येथील विमानतळ परिघामध्ये घनकचरा व्यवस्थापन तसेच सुरू असलेली विविध बांधकामे विमानतळाच्या सुरक्षिततेची मानके पूर्ण करण्यासाठी अडचणीचे ठरतात. ही बाब अडचणीची ठरू नये. तसेच कचरा व्यवस्थापन ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असून प्रत्येक कुटुंबीयांनी ती पार पाडावी अशी अपेक्षा जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर विमानतळ परिघामध्ये करावयाचे बांधकाम नियमितीकरण व घनकचरा विल्हेवाट याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिल्या मजल्यावरील सभागृहात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, प्रांत अधिकारी मोसमी बर्डे – चौगुले, तहसिलदार स्वप्निल पवार, विमानतळ संचालक अनिल शिंदे, नागरी विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम, उदय गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ राठोड म्हणाले, विमानतळ क्षेत्रामध्ये सुरू असलेली किंवा भविष्यात होणाऱ्या नियमित बांधकाम परवानगी करता भारतीय विमानतळ प्राधिकरण, मनपा आणि संबंधित ग्रामपंचायत यांचा ना हरकत दाखला घेणे आवश्यक आहे. याबाबतच्या नियमावलीचे पालन प्रत्येकाकडून व्हायला हवे.
डॉ. जॅस्मिन म्हणाल्या, विमानतळ परिघामध्ये जी काही अनाधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत ती संबंधित ग्रामपंचायतींकडून आयडेंटिफाय करण्यात यावीत.
प्रारंभी प्रास्ताविक श्रीमती मोसमी बर्डे यांनी केले तर अनिल शिंदे यांनी विमानतळ परिघांमध्ये येणाऱ्या विविध नियमावलींबाबत विस्तृत विवेचन केले. या कार्यशाळेसाठी संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी क्रेडाईचे पदाधिकारी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कचरा व्यवस्थापन ही सामूहिक जबाबदारी : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
Mumbai
moderate rain
28
°
C
28
°
28
°
82 %
12.1kmh
83 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

