कोल्हापूर :
डॉ. राजेंद्र भारुड यांच्या पुढाकारातून महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी समग्र शिक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, त्याअंतर्गत शहरातील १८८ शाळांमधील सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांची उचल करण्यात आली आहे. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने विभागीय पाठ्यपुस्तक भांडार, बालभारती शिरोली येथून पाठ्यपुस्तकांची उचल करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ भांडार व्यवस्थापक रविंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
शालेय जीवनात पाठ्यपुस्तकांचे महत्व अनन्यसाधारण असून विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ करण्यात पाठ्यपुस्तकांचे योगदान मोलाचे असते. समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. शहरातील सुमारे ४२ हजार विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत. यासाठी एकूण २ लाख ४९ हजार ३६ प्रतींची आवश्यकता असून त्यांचे वजन जवळपास ५९ टन इतके आहे.
शाळानिहाय, माध्यमनिहाय व इयत्तानिहाय वर्गीकरण करून गवत मंडई येथील आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल येथे पुस्तकांचा सुरक्षित साठा करण्यात आला आहे. शाळांच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके पोहोचावीत, यासाठी वितरणाचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. अवकाळी पाऊस किंवा वाहतुकीदरम्यान नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे.
यावेळी शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासो कांबळे, शहर समन्वयक राजेंद्र आपुगडे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, डी. वाय. पाटील संस्थेकडील विश्वास केसरकर, अधिक्षक सचिन जाधव, जालिंदर गायकवाड, सागर गायकवाड, निर्मिती अधिकारी मनिष निघोट, अविनाश लाड, राजू गेंजगे, शांताराम सुतार आदी उपस्थित होते
शाळेच्या पहिल्याच दिवशी ४२ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप होणार
RELATED ARTICLES
Mumbai
haze
34
°
C
34
°
32.9
°
62 %
7.2kmh
20 %
Thu
33
°
Fri
30
°
Sat
30
°
Sun
30
°
Mon
30
°

