कोल्हापूर :
महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत सेवा उपक्रम राबविण्यात आला. सातारा जिल्ह्यातील लोणंद व फलटण येथे वारकऱ्यांना दूध पावडर, साहित्य ठेवण्यासाठीच्या कापडी पिशव्या, टोपी तसेच दिनदर्शिकांचे गोकुळच्या प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परूळेकर, सुनिल धायगुडे यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याचा जिवंत वारसा आहे. या परंपरेप्रती आदर व्यक्त करत गोकुळतर्फे दरवर्षी पालखी सोहळ्यात विविध सेवा उपक्रम राबविण्यात येतात. पालखी सोहळ्यात महाराष्ट्रातील अनेक दूध उत्पादक वारकरी म्हणून सहभागी होत असल्याने त्यांच्या सेवेत सहभागी होणे आणि गोकुळचा सेवाभाव त्यांच्यापर्यंत पोहोचविणे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सुनिल धायगुडे, सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परूळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, मार्केटिंग विभागाचे सुनिल गायकवाड, विनय पाटील, नवीन येसादे तसेच विविध दिंडी प्रमुख, वारकरी आणि मान्यवर उपस्थित होते.
——————————
‘गोकुळ’तर्फे वारकऱ्यांना साहित्य वाटप
Mumbai
broken clouds
31
°
C
31
°
30.9
°
70 %
4.6kmh
78 %
Mon
31
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

