Homeशैक्षणिक - उद्योग समस्यांवर सोपे आणि परिणामकारक उपाय शोधा : मुरलीधर परुळेकर

समस्यांवर सोपे आणि परिणामकारक उपाय शोधा : मुरलीधर परुळेकर

• डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘हॅकॅत्सोव २०२६’ उत्साहात
कोल्हापूर :
समस्यांचे सोपे, परिणामकारक आणि सर्वांसाठी उपयोगी ठरतील असे उपाय शोधणे हीच खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानाची ताकद असल्याचे प्रतिपादन, मनोरोमा इन्फोसोल्युशन्सचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मुरलीधर परुळेकर यांनी केले.
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘हॅकॅत्सोव २०२६’ मध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा होते. प्रमुख अतिथी म्हणून झेन्सार टेक्नॉलॉजीजचे तसेच मुरलीधर परुळेकर उपस्थित होते.
परुळेकर पुढे म्हणाले की, आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नाही, तर समस्यांकडे व्यापक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीतही योग्य निर्णय घेऊन समस्यांचे प्रभावी निराकरण केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनीही नवोपक्रमशील विचारसरणी आणि व्यावहारिक दृष्टिकोन जोपासणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
“ड्रीम, डेव्हलप, डिलिव्हर” या संकल्पनेवर आधारित या टेक फेस्टमध्ये देशभरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. २४ तास चाललेल्या या स्पर्धेत विविध अभिनव आणि समाजाभिमुख प्रकल्प सादर करण्यात आले.
डॉ. रितुराज पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना सर्जनशीलता आणि नवकल्पनांना प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. त्यांनी स्पर्धेबरोबरच सर्जनशीलता जपणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे सांगितले. संचालक डॉ. अजित पाटील यांनी प्रास्ताविकातून ‘हॅकॅत्सोव २०२६’ची संकल्पना स्पष्ट केली.
स्पर्धेच्या निकालात साताऱ्याच्या ज्ञानेश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी ‘सोनिक पे’ या प्रकल्पाद्वारे प्रथम क्रमांक पटकावला. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगलीच्या विद्यार्थ्यांनी ‘बिट मॅनिप्युलेटर’ या महिलांच्या सुरक्षेसाठीच्या स्मार्ट उपकरणासह प्रथम उपविजेतेपद मिळवले. तर कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संघाने ब्रेल-आधारित शिक्षण उपकरण सादर करून द्वितीय उपविजेतेपद पटकावले. विजेत्या संघांना एकूण ५०,००० रुपयांची पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. विनायक पुजारी यांनी काम पाहिले. यावेळी परीक्षा नियंत्रक अभय जोशी, डॉ. ए. एम. गुरव, आश्विन देसाई, अभिजित मटकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमास कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
3.1kmh
11 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page