Homeशैक्षणिक - उद्योग हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कौशल्य, सेवाभाव महत्त्वाचा : डॉ. शर्मा

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कौशल्य, सेवाभाव महत्त्वाचा : डॉ. शर्मा

• डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत
कोल्हापूर :
हॉस्पिटॅलिटी उद्योग हा सर्वाधिक वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच उत्तम कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यानी केले. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या तसेच विद्यार्थी पालक हस्ते  दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा, प्राचार्य रुधीर बारदेस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. शर्मा म्हणाले की, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, आधुनिक प्रयोगशाळा, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिला जातो. महाविद्यालयीन जीवनात व्यक्तिमत्त्व विकास, व्यावसायिक नैतिकता आणि ग्राहककेंद्री सेवा वृत्ती जोपासल्यास देश-विदेशातील नामांकित हॉटेल्स, रिसॉर्ट्स, क्रूझ, एअरलाईन्स तसेच पर्यटन उद्योगात उज्ज्वल करिअर घडविण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
प्राचार्य रुधीर बारदेस्कर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरा, शिस्त, आधुनिक सुविधा तसेच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.
कुलसचिव डॉ. व्ही. व्ही भोसले यांनी देश विदेशातील करीअर संधीबाबत मार्गदर्शन केले. विद्यापीठात उपलब्ध असणाऱ्या विविध अभ्यासक्रमाबाबतही त्यांनी माहिती दिली. विद्यापीठाच्या आयक्यूएसी संचालक डॉ शिंपा शर्मा यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. सुरज यादव यांनी केले. आभार प्रा. रोहन हवालदार यांनी मानले. यावेळी डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. अजित पाटील, अलायड हेल्थ सायन्सचे कोर्डीनेटर डॉ. आर. एस. पाटील, प्रा. रुबेन काळे, कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील,  उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
79 %
7.9kmh
15 %
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page