कोल्हापूर :
डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, तळसंदे येथील ‘स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ तसेच ‘स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन’मधील बी.टेक आणि एमसीए शाखेतील ३७८ विद्यार्थ्यांची विविध नामांकित राष्ट्रीय कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.
११ जुलै ते १५ जुलै या कालावधीत आयोजित कॅम्पस ड्राइव्हमध्ये पुणे, कोल्हापूर आणि सांगली परिसरातील ४८ आयटी कंपन्यांकडून ही निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ११ महिने इंटर्नशिप कालावधीत आयटी कंपनीमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार असून, त्यांना आकर्षक स्टायपेंडही देण्यांत येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कालावधीतच आयटी क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासास आणि रोजगारक्षमतेस मोठी चालना मिळणार आहे.
संचालक (अकॅडमीक्स) डॉ. संग्राम पाटील, अधिष्ठाता डॉ. वाय. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रदीप पाटील, इंटर्नशीप विभाग संचालक विशाल पुंदिकर, डॉ. एन. ए. पाटील, स्वराज पाटील यांनी या कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन केले होते.
या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष सतेज पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
——————————
डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदेच्या ३७८ विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवड
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
26.9
°
83 %
7.2kmh
7 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°

