HomeUncategorizedविवेकानंद कॉलेजमध्ये सायबर गुन्हेगारी सुरक्षितता अभियान उत्साहात

विवेकानंद कॉलेजमध्ये सायबर गुन्हेगारी सुरक्षितता अभियान उत्साहात

कोल्हापूर :
येथील विवेकानंद कॉलेजमधील वाणिज्य विभाग, आयक्यूएसी आणि सायबर पोलीस ठाणे, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर गुन्हेगारी सुरक्षितता अभियान राबविण्यात आले.
या अभियानामध्ये सायबर गुन्हेगाराकडून सर्वसामान्य नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे. या संदर्भात माहितीपरिपत्रकामार्फत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.
या अभियानामध्ये पासवर्ड, एटीएम, डेबिट – क्रेडीट कार्ड वापरताना कोणती दक्षता घ्यावी, मोबाईल बँकिंग व इंटरनेट बँकिंग वापरताना कोणती दक्षता घ्यावी,  सोशल मीडियाचा वापर व सायबर गुन्हेगारीबद्दल घ्यावयाची काळजी जसे  डिजिटल अटक संकल्पना, महिला व बालकांसंदर्भात होणाऱ्या गुन्हेगारीबद्दल घ्यावयाची काळजी यामध्ये सायबर बुलिंग, ऑनलाईन गेमिंगचा अतिरेक, बबालक  व महिला अत्याचार, तसेच नागरिकांनी सायबर फसवणूक झाल्यास आपली तक्रार करण्यासाठीचे हेल्पलाईन क्रमांक व संकेतस्थळ याविषयी सविस्तर माहिती या अभियाना अंतर्गत माहितीपरिपत्रकामार्फत देण्यात आली.
या अभियानामार्फत कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरीभाग व २७ गावातील ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने १३५० पेक्षा जास्त कुटुंबामध्ये विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील व आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सनी काळे आणि सायबर पोलीस ठाणे, कोल्हापूरचे सागर माळवे व सुकुमार जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या अभियानाचे समन्वयक म्हणून डॉ. उमेश दबडे यांनी काम पहिले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.6 ° C
28.6 °
28.6 °
81 %
8.5kmh
71 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page