कोल्हापूर :
शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्यास राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सोमवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी साखर कारखाना व त्या अंतर्गत राबविले जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.
डॉ. संजय कोलते यांनी सुपर केन नर्सरी टेक्निक अंतर्गत बेने लागवड, सछिद्र निचरा पद्धतीने क्षारपड जमिनीचा विकास कार्यक्रम, एआय आधारित ऊस लागवड, ठिबक सिंचन पद्धतीचा प्रभावी वापर, इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, सिवेजीस ट्रीटमेंट प्लॅट, पर्यावरण लॅब, माती परीक्षण लॅब, आरोग्य केंद्र व इंजिनिअरिंग कॉलेजला भेट दिली. त्यानंतर सभागृहामध्ये कारखान्याचा माहितीपट, क्षारपड जमीन सुधारणा याचे प्रेझेंटेशन दाखवण्यात आले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी स्वागत करून कारखान्याचे गाळप, कारखाना राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. या सर्व उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर डॉ . कोलते यांनी कारखान्यामार्फत शेतीविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात लक्षनीय वाढ होत असलेबाबत समाधान व्यक्त करून कारखाना परिसर पर्यावरण पूरक ठेवल्याबद्दल आभार मानले.
तसेच त्यांनी शिरोळ येथील सभासद शेतकरी विजय रघुनाथ कवठेकर व बकुळ सुरेंद्र बेळुंके यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन क्षारपड जमीन सुधारण्याची काम पाहिले. तसेच औरवाड येथील सभासद संजय कोल्हे, मनोहर गावडे, चंद्रकांत गावडे यांच्या ऊस प्लॉटची पाहणी करून माहिती घेतली. उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या डॉ. अप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील महिला फाउंडेशन बीज बँकेत भेट देऊन विविध बियाण्यांची माहिती घेऊन महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
डॉ. कोलते यांनी कै. आलमखान पठाण कृष्णा सहकारी पाणीपुरवठा लि. आलास या संस्थेस भेट देऊन संस्थेच्या प्रस्तावित १७०० एकर क्षेत्रापैकी ४०० एकर क्षेत्रावरील कार्यान्वित ठिबक सिंचन योजनेची माहिती घेतली. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला सदर पाणीपुरवठा संस्थेच्या आधुनिक पद्धतीचे कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील, प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूरच्या उज्वला पळसकर, तसेच कारखान्याचे संचालक अरुण कुमार देसाई, बाबासो पाटील, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगु माने गावडे, ज्योतीकुमार पाटील, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, इंद्रजीत पाटील, रणजीत कदम, महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, बाळासाहेब पाटील, मंजूर मिस्त्री, कामगार प्रतिनिधी प्रदीप बनगे, सेक्रेटरी अशोक शिंदे, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगांना, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, क्षारपड जमीन सुधारणा योजनेचे प्रोजेक्ट इंजिनियर कीर्तीवर्धन मरजे यांचेसह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
——————————
राज्याचे साखर आयुक्त डॉ.संजय कोलते यांची श्री दत्त उद्योग समूहास सदिच्छा भेट
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
26.9
°
83 %
7.2kmh
7 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°

