Homeशैक्षणिक - उद्योग वन, जल, हवामान संवर्धन हेच शाश्वत शेतीचे तंत्रज्ञान : सागर माने

वन, जल, हवामान संवर्धन हेच शाश्वत शेतीचे तंत्रज्ञान : सागर माने

कोल्हापूर :
जलसंवर्धनाची प्रभावी अंमलबजावणी केल्यास शेती अधिक सक्षम आणि टिकाऊ बनू शकते. वन, जल आणि हवामान यांचे संवर्धन हेच शाश्वत शेतीचे खरे तंत्रज्ञान  आहे, असे प्रतिपादन जलसंवर्धन कार्यकर्ता व जलयुक्त शिवार अभियानचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सागर अशोक माने यांनी केले. डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे कृषी अभियांत्रिकी विभागामार्फत जागतिक वनीकरण दिन (२१ मार्च), जागतिक जल दिन (२२ मार्च) आणि जागतिक हवामान दिन (२३ मार्च) निमित्त विशेष व्याख्यान व पोस्टर सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.
पर्यावरण संवर्धन, जलव्यवस्थापन आणि शाश्वत शेती यावर माने यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर आणि वृक्षसंवर्धन यावर भर देणे गरजेचे आहे. युवकांनी पर्यावरण संवर्धनात सक्रिय भूमिका घेतल्यास शाश्वत शेतीचा मार्ग अधिक सुकर होईल.
कार्यक्रमांतर्गत ‘वन, जल आणि हवामान संवर्धन, शाश्वत शेती’ या विषयावर पोस्टर प्रस्तुतीकरण स्पर्धा झाली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन, हवामान बदल, सूक्ष्म सिंचन व शाश्वत शेती तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या.
कृषी अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख डॉ. मंगल पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबत पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. शाश्वत शेती व जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने कृषी अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाच्या अमीन मुजावर याने केले, तर डॉ. सारिका वांद्रे यांनी आभार मानले. आयोजनासाठी डॉ. प्रदीप दळवी आणि अमोल शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आ. सतेज डी. पाटील, प्र-कुलपती ऋतुराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता आणि कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
28.2 ° C
28.2 °
28.2 °
82 %
8kmh
82 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page