Homeकला - क्रीडाचंद्रकांत चषक 'पाटाकडील'कडे

चंद्रकांत चषक ‘पाटाकडील’कडे

• खंडोबा तालीम मंडळ उपविजेता
कोल्हापूर :
अमीन खझीरने उत्तरार्धात ७८व्या मिनिटाला नोंदवलेल्या एकमेव गोलच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळने खंडोबा तालीम मंडळचा पराभव करून ‘चंद्रकांत चषक’ पटकाविला. गतविजेत्या ‘खंडोबा’ला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पाटाकडीलने यंदाच्या हंगामात राजेश चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत यश मिळवून सलग दुसऱ्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मालिकावीराचा बहूमान अमीन खझीरने मिळवला. सामनावीर म्हणून पाटाकडीलच्या ओमकार मोरे याला गौरविण्यात आले.
दरम्यान, सामन्याच्या मध्यंतराला चंद्रकांत चषकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. यावेळी कोल्हापूर महापालिका परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धत रविवारी (दि. २९) खंडोबा तालीम मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ यांच्यात विजेतेपदासाठी लढत झाली. छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेल्या हा दोन्ही तुल्यबळ संघातील सामना पाहण्यासाठी फुटबॉलशौकिनांची मोठी गर्दी होती. दोन्ही संघाकडून परस्परांचे गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया पण गोलची नोंद झाली नाही. पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला.
उत्तरार्धात गोलची आघाडी घेण्यासाठी पाटाकडीलकडून ऋषिकेश मेथे-पाटील, ओमकार मोरे, अमीन खझीर, रोमारिओ, यशराज कांबळे यांनी खोलवर चढाया केल्या. डी टॉपवरून ऋषिकेश मेथे-पाटीलने मारलेल्या फटक्यावर चेंडू बाहेर गेला. ओमकार मोरेने कॉर्नर किकवर टाकलेल्या लॉपवर ऋषिकेश मेथे-पाटील आणि अक्षय पायमल यांनी हेडव्दारा गोलचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. ओमकार मोरेच्या पासवर अमीर खझीरने गोलक्षेत्रातून सोपी संधी दवडली. खंडोबाच्या संकेत मेढे, रोहित जाधव, पृथ्वीराज साळोखे, विष्णू टी.एम. , कुणाल दळवी, प्रभू पोवार यांनी गोल नोंदवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. अखेर सामना बरोबरीत सुटण्याची शक्यता असताना, नबी खानने मध्यरेषेच्यापुढून मारलेल्या फटक्यावर चेंडू खंडोबाच्या गोलक्षेत्रात आला. त्यावर कब्जा करण्याचा गोलरक्षक आकाश मेस्त्रीचा प्रयत्न फसला. त्या चेंडूवर अमीर खझीरने ताबा मिळवत गोलजाळ्याची दिशा दाखवली. अशाप्रकारे ७८व्या मिनिटाला १-० ची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. त्यानंतर ऋषिकेश मेथे-पाटील व ओमकार मोरे यांनी गोलची संधी गमावली. जादावेळेतील पाच मिनिटात गोलची परतफेड करण्यासाठी खंडोबाच्या खेळाडूंनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. अखेर १-०ची आघाडी राखत पाटाकडीलने सामना जिंकून चंद्रकांत चषकावर मोहोर उमटवली.
बक्षीस समारंभ…
चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात पार पडला. याप्रसंगी शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव, उपमहापौर अक्षय जरग, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, सत्यजित कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख, विजयसिंह खाडे-पाटील, कौसर बागवान, पोलिस निरीक्षक किरणकुमार लोंढे, ओंकार जाधव, बालगोपाल तालीम मंडळचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे, निवास शिंदे, आप्पासाहेब साळोखे, राहूल चव्हाण, युवराज कुरणे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
विजेत्या पाटाकडील तालीम मंडळला रोख २ लाख ३१ हजार रुपये व चषक तर उपविजेत्या खंडोबा तालीम मंडळला रोख १ लाख ३१ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दिलबहार तालीम मंडळ आणि बालगोपाल तालीम मंडळ यांना प्रत्येकी ३१ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. स्पर्धेतील मालिकावीरचा बहूमान अमीन खझीरने पटकाविला. त्याला रोख ३१ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. बेस्ट फॉरवर्ड – विष्णू मणिकंदम (खंडोबा), बेस्ट हाफ – प्रभू पोवार (खंडोबा), बेस्ट डिफेन्स – अक्षय पायमल (पाटाकडील), बेस्ट

RELATED ARTICLES
Mumbai
haze
34 ° C
34 °
33.9 °
66 %
6.7kmh
40 %
Mon
33 °
Tue
31 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
31 °

Most Popular

You cannot copy content of this page