Homeसण - उत्सवघोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजन

घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजन

कोल्हापूर :
संजय घोडावत इन्स्टिट्यूट ग्रीन कॅम्पसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा केवळ उत्सव नसून विद्यार्थ्यांमधील शौर्य, नेतृत्वगुण, स्वाभिमान आणि कर्तृत्व जागवणारा प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व, निबंधलेखन, चित्रकला, देशभक्तीपर गीतगायन अशा विविध स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांना आपले विचार, कौशल्ये आणि सर्जनशीलता सादर करण्याची संधी मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्यातून प्रेरणा घेत प्रत्येक विद्यार्थ्याने उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन  सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख समन्वयक प्रा. सुहास पाटील, प्रा. भाग्यश्री भालकर यांच्याकडून करण्यात आले आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिवजन्मोत्सवाचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी केले आहे. या प्रेरणादायी स्पर्धेसाठी संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
25.6 ° C
25.6 °
25.6 °
68 %
2.9kmh
8 %
Wed
27 °
Thu
26 °
Fri
25 °
Sat
25 °
Sun
25 °

Most Popular

You cannot copy content of this page