Homeकला - क्रीडाआजपासून कव्वाली महोत्सव

आजपासून कव्वाली महोत्सव

• ताराराणी विद्यापीठाच्या व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे रंगणार सुरांची मैफल
कोल्हापूर :
राज्यातील सांस्कृतिक परंपरेला उजाळा देण्यासाठी आणि कव्वाली या कलाप्रकाराला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत कोल्हापुरात भव्य कव्वाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत राजारामपुरी येथील ताराराणी विद्यापीठाच्या व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे हा महोत्सव पार पडणार आहे. ​नामवंत कव्वाल आपली कला सादर करणार आहेत. सुफी संगीत आणि कव्वालीच्या माध्यमातून भक्ती आणि प्रेमाचा संदेश देणारे दिग्गज कलाकार या निमित्ताने एकाच मंचावर येणार आहेत.
​राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लुप्त होत चाललेल्या लोककलांना आणि संगीत प्रकारांना उभारी देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सातत्याने प्रयत्नशील असून, या महोत्सवाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या कलाप्रेमींना एक आगळीवेगळी पर्वणी मिळणार आहे.
​           दि. २१ फेब्रुवारी रोजी हाजी सुलतान नाजा व रोहित अली यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार असून दि. २२ फेब्रुवारीला राहुल शिंदे तर दि. २३ फेब्रुवारी रोजी हैदर नाजा, पुणे यांचा कव्वालीचा कार्यक्रम सादर होणार आहे​. कव्वाली ही केवळ गायकी नसून ती एक आध्यात्मिक अनुभूती आहे. कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा आणि सुरांच्या या अनोख्या प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
81 %
8.1kmh
100 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page