कोल्हापूर :
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या केमिकल विभागाच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ, ब्लँकेट, क्रीडा साहित्य वाटप असे सामाजिक विविध उपक्रम राबविण्यात आले.
या विभागाच्या शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी स्वयं मतिमंद शाळा येथे विद्यार्थ्यांसाठी फळे व खाऊ वाटप केली. आलाय संकुल, शिये येथील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्यचे वाटप केले. त्याचबरोबर भवानी मंडप व महालक्ष्मी मंदिर परिसर येथील थंडीमध्ये उघड्यावर झोपलेल्या गरजूंना शंभरहून अधिक ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
कोल्हापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजू लटकर, गौरव राजू पसारे, केमिकल विभाग प्रमुख के. टी. जाधव, अधिष्ठाता (संशोधन) डॉ. अमरसिंह जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साहित्य वाटप करण्यात आले.
डॉ. राहुल महाजन, प्रा पूनम मंडळे, प्रा. सुमित पोद्दार तसेच विद्यार्थी प्रतिनिधी सिद्धार्थ वलशेट्टी, रुपेश निंबाळकर, किरण ढेरे, रोहन यादव, कुबेर हवालदार यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
डॉ. संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक उपक्रम
Mumbai
light rain
28.1
°
C
28.1
°
28.1
°
81 %
7.7kmh
100 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
28
°

