कोल्हापूर :
आपल्या सैन्याची हानी होणार नाही याची दक्षता घेवून शिवरायांनी युक्तीच्या जोरावर लढाया जिंकल्या, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा. राजेंद्र पाटील यांनी केले. ते शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापचे शहर चिटणीस भाई बाबुराव कदम होते.
यावेळ बोलतांना प्रा, पाटील म्हणाले, शिवरायांनी प्रत्येकाच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम केलं म्हणूनच स्वराज्याची निर्मिती होवू शकली. आपल्या सैन्याची हानी होणार नाही याची दक्षता घेवून शिवरायांनी युक्तीच्या जोरावर लढाया जिंकल्या. महिलांचा आदर करण्याबरोबरच रयतेच्या हितासाठी अरिष्ठ रुढी परंपरेला छेद देण्याच काम त्यांनी केल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. यावेळी पन्हाळागडचा वेडा, शाहिस्तीखान, अफझलखान वध, आग्रा भेट, पावनखिंडीची लढाई या घटनांची प्रा. पाटील यांनी माहिती दिली.
याप्रसंगी प्राचार्य जी. पी. माळी, राजाराम धनवडे, संभाजी जगदाळे, संग्राम माने, इकबाल शेख, मधुकर हरेल, वैशाली सुर्यवंशी, गीता कदम, शितल पोवाळकर, माधवी हरेल, डॉ. संदेश कचरे, प्रकाश शिंदे, मोहन पाटील, डॉ. डी. के. हवालदार, महेश जाधव, टी. एस. कांबळे, बी. आर. महाजन यांच्यासह शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवरायांनी युक्तीच्या जोरावर लढाया जिंकल्या : प्रा.राजेंद्र पाटील
Mumbai
clear sky
29
°
C
29
°
28.9
°
79 %
4.1kmh
6 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

