कोल्हापूर :
उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) मधील ऑटोमोबाईल विभागामार्फत आयोजित ‘ऑटोफेस्ट २०२६’ मध्ये लिमिटलेस क्रू सांगली बायकर्सच्या कुशल व्यावसायिक रायडर्सनी बाईक व कार यांचे चित्तथरारक स्टंट सादर करत तरूणाईला चकीत केले. हवेत झेपावणाऱ्या बाईक व वेगाने फिरणाऱ्या कार पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. प्रदर्शनाच्या सुरूवातीस मोहिते सुझुकी तर्फे ई-ॲक्सेस या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण एनआयटीचे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांचे हस्ते करण्यात आले.
प्रदर्शनात कावासाकी निन्जा ३००, झेड ८००, झेड ९००, कॉन्टिनेन्टल, इंटरसेप्टर, व्हिड कट्टर इंजिनची डर्ट बाईक या स्पोर्ट्स बाईक तर बीएमडब्ल्यू, अल्काझर, फोक्सवॅगन, इनोव्हा, थार, स्विफ्ट या मॉडिफाईड कार आणि विंटेज ट्रक, विलीज जिप्स सादर करण्यात आल्या. सुझुकी जिक्सरचे मॉडेल्स व सुझुकी अवेनिस स्पोर्ट्स बाइक्स यांची टेस्ट राईड विद्यार्थी व स्टाफ यांना मिळाली.
दरम्यान, अशा प्रकारचे स्टंट सार्वजनिक रस्त्यांवर व इतरत्र न करण्याचे आवाहन मोहिते सुझुकीचे पदाधिकारी राजेंद्र गुरव यांनी उपस्थितांना केले. यावेळी मोहिते सुझुकीचे मुकेश गायकवाड, मानसी लांबे, एनआयटीमधील विभागप्रमुख, स्टाफ, विद्यार्थी व कोल्हापूर परिसरातील तरूणवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमास चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. ऑटोफेस्टच्या आयोजनासाठी ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा. सुहासचंद्र देशमुख व समन्वयक प्रा. आशिष थोरात यांचेसह समर्थ कोकाटे, अथर्व चव्हाण, तन्मय इंगळे, अमन नायकवडी आदी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक मोहिते सुझुकी तर सहप्रायोजक आराध्य तेंडोलकर होते.
एनआयटीमध्ये चित्तथरारक ऑटो शो
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1
°
C
28.1
°
28.1
°
81 %
7.7kmh
100 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
28
°

