Homeशैक्षणिक - उद्योग आता आठवड्यातील सातही दिवस सकाळी आणि संध्याकाळी कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा

आता आठवड्यातील सातही दिवस सकाळी आणि संध्याकाळी कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा

• २९ मार्चपासून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा
कोल्हापूर :
कोल्हापूर विमानतळावर नवी टर्मिनस बिल्डिंगसह विविध विकासकामे सुरू आहेत. विविध नवे हवाई मार्ग सुरू होत आहेत. अशावेळी कोल्हापूरच्या पर्यटन,  उद्योग क्षेत्रासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर आठवड्यातील सातही दिवस, सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांमध्ये इंडिगो कंपनीकडून विमान सेवा सुरू होत आहे. २९ मार्चपासून कोल्हापूर ते नवी मुंबई विमानतळ, या दरम्यान इंडिगोकडून नवी सेवा सुरू होत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
रोज सकाळी आठ वाजता नवी मुंबई विमानतळावरून कोल्हापूरसाठी इंडिगोचे विमान उड्डाण घेईल आणि ९:१५ वाजता हे विमान कोल्हापुरात येईल. त्यानंतर सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान नवी मुंबई विमानतळावर १० वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. तर सायंकाळी ७:२० वाजता नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान ८:३० वाजता कोल्हापुरात येईल. त्यानंतर ८ वाजून ५० मिनिटांनी कोल्हापुरातून सुटणारे विमान ९:५० वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरेल. विशेष म्हणजे आठवड्यातील सातही दिवस इंडिगो कंपनीची विमानसेवा सुरू होत असल्याने, कोल्हापुरातून मुंबईला जाऊन दिवसभरातील कामे पूर्ण करून, पुन्हा सायंकाळी कोल्हापूरला परत येणे सहज शक्य होणार आहे.
कोल्हापूरकरांची एक प्रदीर्घ मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून कोल्हापूर मुंबई मार्गावर दैनंदिन आणि सोयीस्कर वेळेतील विमानसेवा सुरू होत आहे. सुरुवातीला या मार्गावरील तिकीट दर ७,६०० रुपये असणार आहे. पर्यटन, उद्योग- व्यवसाय या दृष्टीने ही नवी विमानसेवा अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.6 ° C
28.6 °
28.6 °
73 %
5.1kmh
2 %
Sat
29 °
Sun
31 °
Mon
30 °
Tue
30 °
Wed
30 °

Most Popular

You cannot copy content of this page