Homeसण - उत्सवआजपासून जोतिबाचे खेटे

आजपासून जोतिबाचे खेटे

कोल्हापूर :
दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील श्री जोतिबा देवाच्या खेट्यांना रविवारी (दि.८) प्रारंभ होत आहे. माघ महिन्यातील पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारपासून खेट्यांना प्रारंभ होतो. पाच रविवारी होणारे खेटे महत्त्वपूर्ण व मानाचे मानले जातात. या खेट्यांसाठी कोल्हापुरातील भाविकांची मोठी गर्दी असते. तसेच महाराष्ट्रासह कर्नाटकमधूनही अनेक भाविक येतात.
जोतिबा डोंगरावर माघ महिन्यात पाच रविवारी भरणाऱ्या यात्रेला ‘जोतिबाचे खेटे’ असे म्हणतात. या खेट्यांमध्ये भाविक अनवाणी पायानेच डोंगर चालतात. माघ महिन्यातील पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारपासून खेट्यांना प्रारंभ होतो. या खेट्यांच्या निमित्ताने श्री जोतिबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जोतिबाच्या खेट्यांना पहाटे चार वाजल्यापासून प्रारंभ होतो. कोल्हापुरातील अनेक भाविक पंचगंगा नदीकाठी आंघोळ करून ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करतात आणि डोंगराच्या दिशेने चालू लागतात. खेट्यासाठी येणाऱ्या भाविकांमुळे डोंगरासभोवती असणाऱ्या जोतिबा देवाच्या डोंगरवाटाही गर्दीने फुलून जातात आणि डोंगर दुमदुमून जातो. या खेट्यांमुळे जोतिबा डोंगरावर यात्रेचे स्वरूप आलेले असते.
या खेट्यांच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने जोतिबा मंदिरात तयारी पूर्ण आहे. दरम्यान, रविवारी पहाटे घंटानाद करून श्रींच्या मंदिराचे दरवाजे उघडले जातील. त्यानंतर श्रींची काकड आरती, धूपारती होईल. यानंतर सकाळी ‘श्रीं’सह नंदी, महादेव, चोपडाई, काळभैरव, यमाई, दत्त व रामलिंग या देवांना महाअभिषेक व अलंकार घालून महापूजा करण्यात येईल. त्यानंतर धार्मिक विधी करून महानैवेद्य दाखवण्यात येईल. त्यानंतर धुपारती सोहळा होईल. रात्री आठ वाजता उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवक, डवरी, पुजारी, देवस्थान समितीचे व सिंदिया देवस्थान समितीचे अधिकारी आणि कर्मचारी असा मोठा लवाजमा पालखी सोहळ्यासाठी निघेल. यावेळी धार्मिक विधीने पालखी सोहळा होईल.

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
29 ° C
29 °
29 °
74 %
3.6kmh
35 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page