कोल्हापूर :
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश डी. अंबानी यांनी सांगितले की, भारतामध्ये पुढील २० ते ३० वर्षांत २५ ते ३० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याची क्षमता आहे. हा काळ देशातील तरुण पिढीसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबईत आयोजित जियो-ब्लॅकरॉकच्या ‘इन्व्हेस्टिंग फॉर ए न्यू एरा’ या कार्यक्रमात ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक यांच्यासोबत झालेल्या फायरसाइड चर्चेदरम्यान अंबानी यांनी भारताच्या विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला.
जियो-ब्लॅकरॉक कार्यक्रमात बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, भारत पारंपरिकपणे बचतीचा देश राहिला आहे; मात्र आता देशाच्या प्रगतीचा लाभ गुंतवणुकीच्या माध्यमातून घेण्याची वेळ आली आहे. बचतीचे रुपांतर गुंतवणुकीत झाले पाहिजे. कॅपिटल मार्केट्समध्ये केलेली गुंतवणूक केवळ कुटुंबांची संपत्ती वाढवणार नाही, तर देशाच्या आर्थिक वाढीलाही चालना देईल. याला दुजोरा देताना लॅरी फिंक यांनी सांगितले की, भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या देशात दीर्घकालीन इक्विटी गुंतवणूक ही संपत्ती निर्मितीची सर्वात प्रभावी पद्धत ठरू शकते.
अंबानी यांनी सांगितले की, भारताच्या विकासाची पायाभरणी भक्कम धोरणे, राजकीय स्थैर्य, मोठ्या प्रमाणावर उभारण्यात येणारी पायाभूत सुविधा आणि डिजिटल क्रांतीवर आधारित आहे. 5G, डिजिटल इंडिया आणि कॅपिटल मार्केट्सच्या विस्तारामुळे भारत दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक आकर्षक केंद्र बनला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) भर देताना अंबानी म्हणाले की, एआयमुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडू शकतो. एआयच्या माध्यमातून उच्च दर्जाचे शिक्षण, अधिक सक्षम आरोग्यसेवा आणि प्रभावी सार्वजनिक सेवा १.४ अब्ज नागरिकांपर्यंत परवडणाऱ्या आणि सुलभ स्वरूपात पोहोचवणे शक्य होईल.
कार्यक्रमात ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक यांनी भारताला ‘एरा ऑफ इंडिया’ असे संबोधले. यावर प्रतिक्रिया देताना अंबानी म्हणाले की, जे लोक भारताच्या दीर्घकालीन वाढीवर विश्वास ठेवतील, तेच येत्या दशकांत सर्वाधिक लाभ मिळवतील.
पुढील दोन-तीन दशकांत भारत ३० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल : मुकेश अंबानी
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28.8
°
C
28.8
°
28.8
°
72 %
2.1kmh
44 %
Wed
30
°
Thu
29
°
Fri
29
°
Sat
29
°
Sun
29
°

