Homeशैक्षणिक - उद्योग महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल! 

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल! 

• सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात १.५७ लाख नवीन ग्राहकांची नोंद – ट्राय
कोल्हापूर :
रिलायन्स जिओने सप्टेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्रात १.५७ लाख नवीन मोबाईल ग्राहकांची नोंद करत सर्व टेलिकॉम कंपन्यांमध्ये आघाडी घेतली आहे, अशी माहिती टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिओने गेले तीन महिने आपल्या ग्राहकांमध्ये सातत्याने भर घातली आहे.
यासोबतच इतर टेलिकॉम ऑपरेटर्सने मात्र नाममात्र भर घातल्याचे दिसून येते. ट्राय च्या आकडेवारीनुसार भारती एअरटेल ५२२५५ तर व्होडा आयडियाने ५०५०४ नवीन ग्राहकांची भर घातली आहे तर बीएसएनएलने ३४६१० नवीन ग्राहकांची भर घातली आहे.
राज्यात, फिक्स्ड वायरलेस अ‍ॅक्सेस क्षेत्रात जिओ आपल्या नेतृत्वाची पुनःस्थापना करत असून, जिओ एअरफायबर सेवा हा स्पष्ट अग्रगण्य पर्याय ठरतो आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्रातील सक्रीय जिओ एअरफायबर वापरकर्त्यांची संख्या ५५२२६५ इतकी झाली असून तुलनेत एअरटेलचे २००८१३ ग्राहक नोंदवले आहेत.
जिओच्या जलद नेटवर्क विस्तार, परवडणाऱ्या योजना आणि एकत्रित डिजिटल सेवांमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात गृह व व्यावसायिक कनेक्टिव्हिटीमध्ये आमूलाग्र बदल घडतो आहे. शहरी व ग्रामीण भागांतून वेगवान इंटरनेटची वाढती मागणी लक्षात घेता, जिओ ही डिजिटल दरी मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
27.2 ° C
27.2 °
27.2 °
81 %
13kmh
100 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page