• डीवायपी सिटी मॉल १०वा वर्धापनदिन उत्साहात
कोल्हापूर :
डी.वाय.पी सिटी मॉलच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये चांगले शॉपिंग डेस्टिनेशन उपलब्ध करून दिले आहे. यापुढील काळातही कोल्हापूरकरांना अधिकाधिक चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी डी. वाय. पाटील ग्रुप कटिबद्ध असल्याची ग्वाही डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली. डी. वाय. पाटील सिटी मॉलच्या १०व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. पाटील यांच्याहस्ते
डीवायपी सिटी मॉलमध्ये दहा वर्षांपासून कार्यरत टेनंट, व्हेंडर, कर्मचारी, तसेच उत्कृष्ट अधिकारी यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या डीवायपी सिटी मॉलचा १०वा वर्धापनदिन सोहळा हॉटेल सयाजीच्या मेघमल्हार सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्रोजेक्ट हेड डॉ. सदानंद सबनीस, आर्किटेक्ट संभाजी पाटील आदी उपस्थित होते. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते केक कापून मॉलचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी डीवायपी सिटी मॉलच्या प्रवासावर व्हिडिओ दाखवण्यात आला.
प्रास्ताविक सीएचआरओ श्रीलेखा साटम यांनी केले. यामध्ये त्यांनी मॉलच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीबद्दल माहिती दिली.
यावेळी बोलताना डॉ. संजय डी. पाटील यांनी, हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे. कोल्हापूरकरांना फन, फूड, फॅशनचा आनंद देण्यासाठी या मॉलची निर्मिती केली. गेल्या १० वर्षात ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. टेनंट, व्हेंडरचे सहकार्य आणि प्रमाणिक व कार्यक्षम कर्मचाऱ्यांची साथ यामुळे दहा वर्षाचा टप्पा पूर्ण केला आहे. मॉल आणखीन ७५ हजार स्केअर फूट विस्तार करत आहोत. याठिकाणी कोल्हापूरकरांना अधिकाधिक चांगल्या सेवा सुविधा देण्यावर आमचा भर राहील.
विश्वस्त पृथ्वीराज पाटील म्हणाले, डीवायपी सिटी मॉल फायदेशीर ठरणार नाही असा सल्ला अनेकांनी दिला होता. मात्र, डॉ. संजय डी. पाटील यांनी पाहिलेलं हे स्वप्न सत्यात उतरवल. आज १० वर्षात प्रतिसाद सतत वाढत आहे. लवकरच रौप्य महोत्सवही थाटात साजरा करू.
याप्रसंगी प्रोजेक्ट हेड डॉ. सदानंद सबनीस, आर्किटेक्ट संभाजी पाटील, शॉपर स्टॉपचे रवींद्र कांबळे, पीव्हीआरचे प्रमोद पिंगळे, विजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. सुनंदा शिंदे यांनी केले तर आभार निखिल यादव यांनी मानले.
यावेळी डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सतीश पावसकर, हॉटेल सयाजीचे जनरल मॅनेजर मुकेश रक्षित, सीए अमितकुमार गावडे, ॲड. रोहन पाटील, कॉसमॉस बँकेचे अधिकारी वर्ग यांच्यासह सर्व टेनंट, व्हेंडर, कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————-
कोल्हापूरकरांना आणखी चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी कटिबद्ध- डॉ. संजय डी. पाटील
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
83 %
3.6kmh
100 %
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°

