कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इंटरझोनल महिला व पुरुष तलवारबाजी स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालयच्या तलवारबाजी संघाने चार गोल्ड, दोन सिल्वर व तीन ब्राँझ मेडल मिळवून बाजी मारली.
महाविद्यालयाचा संघ शिवाजी विद्यापीठाच्या तलवारबाजीच्या संघामध्ये स्थान निश्चित करून गुरुनानक देव युनिव्हर्सिटी अमृतसर येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
विवेकानंद महाविद्यालय तलवारबाजी संघात श्रवण काटकर, श्रीशैल शिंदे, रितेश पोवार, श्लोका शिंदे, निकिता मुळे व सई पवार यांनी यश मिळविले.
या खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-
विवेकानंद महाविद्यालयाचे तलवारबाजी स्पर्धेत यश
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28.9
°
28
°
78 %
5.1kmh
41 %
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

