कोल्हापूर :
कोल्हापुरातील उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रातील स्थिती मजबूत असून येथील उत्पादने दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसह कोल्हापुरातील उद्योगांसोबत व्यावसायिक भागीदारी करण्यास आम्ही इच्छूक आहोत. तसेच कोल्हापुरात गुंतवणुकीसाठीही आम्ही तयार आहोत, असे प्रतिपादन इंडोनेशियाचे कौन्सिलेट जनरल एडी वर्दोया यांनी केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड अग्रिकल्चरच्या पुढाकाराने उद्यमनगर येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या झंवर सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी इंडोनेशिया कौन्सिलेट वाणिज्य विभागाचे एको जुनोर, अधिकारी श्रीमती डायन हयाती सॅम्स्यूवीर किबे, प्रशासन विभागाचे मुस्तपा अन्सारी, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत कोल्हापूर इंजि. असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, शांताराम सुर्वे, उद्योजक सचिन शिरगावकर, गोशिमाचे अध्यक्ष सुनिल शेळके, कोल्हापूर चेंबरचे मानद सचिव जयेश ओसवाल, एस. डी. पेंडसे, रौनक शहा, मनोज झंवर, धैर्यशील पाटील यांनी सहभाग घेतला. आणि कॉऊन्सिलेट जनरल यांच्याशी संवाद साधला.
यावेळी राहुल नष्टे, धनंजय दुग्गे, ओंकार पोळ, हर्षवर्धन मालू, नितीन वाडीकर, प्रितेश कर्नावट, राहुल मेंच, विमलकुमार बंब, रमाकांत मालू, विजय म्हामणे, इखालस पाटील, कुशल सामानी, प्रसन्ना तेरदाळकर, एस. आर. कडुकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना एडी वर्दोया म्हणाले की, कोल्हापुरातील उद्योजकांनी आपल्या उद्योगाची नोंदणी इंडोनेशिया कौन्सिलेटच्या चेन्नई येथील उद्योग विभागाकडे करावी. यामुळे तुमच्या उत्पादनांची माहिती इंडोनेशियातील व्यापारी आणि उद्योजकांपर्यंत थेट पोहोचेल. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून भागीदारीसाठी इच्छूक उद्योजकांशी आम्ही चर्चा करू आणि पुढील दिशा निश्चित करू. ऑक्टोबर २०२५ मध्ये इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे ४०वे व्यापार प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाला कोल्हापुरातील उद्योजक आणि उत्पादकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविकात इंडोनेशियाच्या प्रतिनिधींचे स्वागत केले. ते म्हणाले, भारत आणि इंडोनेशिया यांचे व्यापारी तसेच राजकीय संबंध सौहार्दपूर्ण आहेत. राज्यात नवनवीन उद्योग आणि विदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र चेंबरही आंतरराष्ट्रीय व्यापार-उद्योग संबंध वृद्धीवर लक्ष केंद्रीत करून कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर इंडोनेशिया कौन्सिलेटचे कोल्हापुरात आगमन आणि उद्योजकांशी थेट संवाद हा आनंददायी आहे.
——————————————————-
महाराष्ट्रातील उद्योगांसाठी इंडोनेशियाची दारे खुली : कौन्सिलेट जनरल एडी वर्दोया
RELATED ARTICLES
Mumbai
haze
25
°
C
25
°
25
°
69 %
0kmh
0 %
Sun
26
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

