Homeशैक्षणिक - उद्योग डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयात एनएसएस स्थापना दिन उत्साहात

डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयात एनएसएस स्थापना दिन उत्साहात

कोल्हापूर :
समाजसेवा, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालय, तळसंदे येथे राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) स्थापना दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन २०२६ च्या संचलनात एन.एस.एस.च्या राष्ट्रीय पथकातून सहभागी होऊन कर्तव्य पथावर संचलन केलेल्या श्वेताली निकम यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एन.एस.एस.च्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध संधी, स्वयंशिस्त, नेतृत्वगुण, संघभावना आणि राष्ट्रसेवेची भावना याबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्तरावरील संचलनाचा अनुभव सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना एन.एस.एस.च्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. के. मयेकर यांनी केले. त्यांनी एन.एस.एस.च्या कार्याचा उद्देश स्पष्ट करताना समाजातील विविध प्रश्न समजून घेऊन त्यासाठी सकारात्मक योगदान देण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या निबंध व पोस्टर निर्मिती स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेत पायल दिगंबरे हिने प्रथम तर नचिकेत पिसे याने द्वितीय आणि सृष्टी वाईंगडे हिने तृतीय क्रमांक मिळवला. पोस्टर निर्मिती स्पर्धेत तनिष्का रावल हिने प्रथम, सानिका पाटील व प्रतिमा पाटील यांनी द्वितीय तर राजनंदिनी देशमुख, सिद्धी  सोनावणे व विभावरी  दबाडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. आर. आर. पाटील व प्रा. एस. के. मयेकर यांनी केले.
एन.एस.एस.च्या ब्रीदवाक्याचा अर्थ स्पष्ट करताना अमन राऊत या विद्यार्थ्याने आपल्या मनोगतातून एन.एस.एस.मधील अनुभव मांडले.
प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार म्हणाले, एनएसएस हा केवळ विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांविषयी संवेदनशील राहून समाजासाठी कोणत्याही अपेक्षेशिवाय कार्य करावे, तसेच ‘नॉट मी, बट यू’ हे ब्रीदवाक्य आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते. रिया वीर हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर श्रेया पाटील हिने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. एस. के. मयेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.8 ° C
27.8 °
27.8 °
79 %
5.6kmh
2 %
Tue
28 °
Wed
29 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
31 °

Most Popular

You cannot copy content of this page