Homeकला - क्रीडाभारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक प्रिया पी.व्ही. यांची केएसएला सदिच्छा भेट

भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक प्रिया पी.व्ही. यांची केएसएला सदिच्छा भेट

कोल्हापूर :
भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक प्रिया पी.व्ही. यांनी के.एस.ए (कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन) ला नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी अखिल भारतीय महिला समितीच्या सदस्या सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी के.एस.ए.चे पदाधिकारी माणिक मंडलिक, अमर सासणे, राजेंद्र दळवी, तसेच सदस्य विश्वंभर मालेकर, दीपक घोडके, प्रदीप साळोखे आदींसह अमित पवार, रघु पाटील, पृथ्वी गायकवाड, सोनाली साळवी यांच्यासह जळगाव येथे आंतरजिल्हा स्पर्धेसाठी रवाना होणाऱ्या के.एस.ए.च्या वरिष्ठ महिला फुटबॉल संघातील सर्व खेळाडू उपस्थित होते.
याप्रसंगी सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मुली व महिला फुटबॉलपटूंमध्ये फुटबॉल खेळाची वाढत असलेली आवड, त्याचा प्रसार तसेच या खेळाच्या माध्यमातून होत असलेल्या सर्वांगीण विकासाची माहिती प्रशिक्षक प्रिया पी.व्ही. यांना दिली.
यावेळी प्रिया पी.व्ही. यांनी उपस्थित महिला फुटबॉलपटूंशी संवाद साधला. फुटबॉल खेळामुळे उत्तम शारीरिक क्षमता विकसित होण्याबरोबरच आत्मविश्वास निर्माण होतो. अचूक पासिंग, योग्य निर्णयक्षमता आणि खेळातील सातत्यामुळे एकाग्रता व बौद्धिक क्षमता वाढण्यासही मोठी मदत होते, असे त्यांनी सांगितले.
कोल्हापुरात लोकप्रिय असलेल्या फुटबॉल खेळाच्या विकासासाठी सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या राजपरिवाराचे त्यांनी विशेष आभार मानले. महिला फुटबॉलच्या विकासासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
30 ° C
30 °
28.9 °
70 %
5.7kmh
93 %
Thu
29 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °

Most Popular

You cannot copy content of this page