कोल्हापूर :
येथील विवेकानंद कॉलेजची एम.बी.ए. भाग १ मध्ये शिकणारी विद्यार्थिनी श्लोका श्रीपती शिंदे हिला फेन्सींग या क्रीडा प्रकारामध्ये विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
श्लोका शिंदे हिने राज्य स्पर्धेत २५ वेळा, राष्ट्रीय स्पर्धेत १४ वेळा, आंतरविद्यापीठीय स्पर्धेत चारवेळा, खेलो इंडिया स्पर्धेत दोनवेळा सुयश संपादन केलेले आहे. तिच्या क्रीडा क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीमुळे तिला विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद एस. हुजरे यांनी अभिनंदन केले आहे. श्लोका शिंदे हिला जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तिच्या या यशाबद्दल तिचे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.
——————————
विवेकानंद कॉलेजची श्लोका शिंदे जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
30
°
C
30
°
28.9
°
70 %
5.7kmh
93 %
Thu
29
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°

