Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस प्रवेश क्षमतेत ५० जागांची वाढ

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस प्रवेश क्षमतेत ५० जागांची वाढ

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत नॅशनल मेडिकल कमिशनने (एनएमसी)ने ५० जागांनी वाढ  केली आहे. त्यामुळे महाविद्यालयाची प्रवेश क्षमता १५० वरून २०० इतकी झाली आहे. यामुळे अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.
महाविद्यालयात आयोजित विशेष समारंभात डॉ. संजय पाटील यांनी ही घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. पाटील यांच्या हस्ते केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला.
डॉ. पाटील म्हणाले, १९८९ मध्ये सुरू झालेल्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजने आजपर्यंत हजारो गुणवंत डॉक्टर घडविले आहेत. एनएमसीकडून मिळालेली अतिरिक्त ५० जागांची मंजुरी ही संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, सक्षम अध्यापन व्यवस्था आणि आधुनिक आरोग्यसेवेवर ठेवलेल्या विश्वासाची पावती आहे. भविष्यातही जागतिक दर्जाचे वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवा यासाठी विद्यापीठ कटिबद्ध राहील.
यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा यांनी मनोगत व्यक्त केले.
उपअधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई यांनी आभार मानले. यावेळी सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उप कुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, विभाग प्रमुख प्राध्यापक उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.8 ° C
28.8 °
28.8 °
74 %
5.1kmh
94 %
Thu
29 °
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page