Homeशैक्षणिक - उद्योग कृषी व कृषी संलग्न पदवी प्रवेशासाठी डी. वाय. पाटील कृषी संकुलात निशुल्क...

कृषी व कृषी संलग्न पदवी प्रवेशासाठी डी. वाय. पाटील कृषी संकुलात निशुल्क मार्गदर्शन

• २५ जुलैपर्यंत मोफत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया
कोल्हापूर :
कृषी व कृषी संलग्न पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत अचूक मार्गदर्शन मिळावे यासाठी तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी आणि डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात निशुल्क प्रवेशपूर्व मार्गदर्शन व ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील यांनी केले आहे.
कृषी व कृषी संलग्न पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला १० जुलै पासून सुरुवात झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी २५ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. विद्यार्थी व पालकांमध्ये प्रवेश प्रक्रियेबाबत कोणताही संभ्रम राहू नये या उद्देशाने ही विशेष सुविधा सुरू करण्यात आली आहे. महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापक व प्रवेश समितीमार्फत विद्यार्थ्यांना पात्रता, अभ्यासक्रमाची निवड, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम तसेच संपूर्ण ऑनलाइन अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
डी. वाय. पाटील कृषी संकुल तळसंदे येथे विद्यार्थिनींसाठी शासन नियमानुसार मोफत शिक्षण सुविधा उपलब्ध असून, सर्व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध शासकीय शिष्यवृत्ती योजनांचाही लाभ मिळतो. तसेच मुला-मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित व सुसज्ज वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे.
बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी) व बी.एस्सी. (कृषी) प्रवेशासंदर्भातील संपूर्ण माहिती, प्रवेशपूर्व मार्गदर्शन यासाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी डी. वाय. पाटील कृषी संकुल, तळसंदे येथे प्रत्यक्ष भेट देऊन या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८८०६०८९५९९, ९३५६८०११८३ बी.टेक. ॲग्री, ७०६६९४४९५९ बी.एस्सी. ॲग्री या क्रमांकावर संपर्क साधावा.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28.9 °
28 °
78 %
5.1kmh
41 %
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page