Homeकला - क्रीडाहिल रायडर्सची ७४वी पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहीम यशस्वी

हिल रायडर्सची ७४वी पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहीम यशस्वी

कोल्हापूर :
मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची तमा न बाळगता, उरी केवळ आणि केवळ शिवभक्तीचे वादळ बाळगून ‘हिल रायडर्स’ परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ७४वी पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहीम अतिशय उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाली. संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली मोहिम यशस्वी करण्यात आली.
गेली ४० वर्षे अविरतपणे सुरू असलेल्या या उपक्रमाचे यंदा ४१ वे वर्ष आहे. यावर्षी शक्ती आणि भक्तीच्या या अनोख्या संगमात ३०० हून अधिक शिवप्रेमींनी सहभाग नोंदवून बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशिद यांच्या पराक्रमाच्या स्मृतींना उजाळा दिला. य मोहिमेत राज्याभरातून शिवभक्तांची अलोट गर्दी झाली होती.
या ऐतिहासिक मोहिमेचे आकर्षण संपूर्ण महाराष्ट्रात असून, यंदा छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, सांगली यांसह विविध भागांतून तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निसर्गाचे रौद्ररूप समोर असतानाही, ५० किलोमीटरचा अत्यंत खडतर आणि निसरडा मार्ग पार करत या शिवभक्तांनी पावनखिंडीत प्रवेश केला. स्वराज्य रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या नरवीर मावळ्यांच्या पवित्र स्मृतीस सर्वांनी अत्यंत भावूक होऊन अभिवादन केले.
पन्हाळगडावरून निघालेली ही मोहीम अंबेवाडी येथे पहिल्या मुक्कामासाठी थांबली. त्यानंतर निसर्गाच्या आव्हानांचा सामना करत सर्व शिवप्रेमी पावनखिंडीत पोहोचले. पावनखिंडीच्या पवित्र भूमीत विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी घेतलेला ‘ध्येय मंत्र’ आणि ‘प्रेरणा मंत्र’ यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. या थरारक मोहिमेची सांगता भाततळी येथील सुखाई मंदिर येथे झाली. याठिकाणी संस्थेचे दिवंगत शिलेदार सुरज ढोली व युवराज साळोखे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा मानाचा ‘शिलेदार ट्रॉफी’ पुरस्कार सातारचे राजपुरोहित यांना प्रदान करण्यात आला.
एवढ्या मोठ्या मोहिमेत सुरक्षितता राखण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे ४० हून अधिक ‘आपाद सखी’ आणि ‘आपाद मित्र’ यामध्ये सक्रिय सहभागी झाले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी हिल रायडर्स परिवाराच्या प्रमुख शिलेदारांनी अहोरात्र कष्ट घेतले. यामध्ये प्रताप माने, मनोज पाटील, प्रसाद आडनाईक, सुहास बेलेकर, श्रावणी जामदार, शिवतेज पाटील, विशाल लिंगाडे, प्राची नलवडे, अथर्व सूर्यवंशी यांसह ५० कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
27.9 °
79 %
7.7kmh
75 %
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page