Homeशैक्षणिक - उद्योग ‘गोकुळ’मध्ये सहकार सप्ताह उत्साहात साजरा

‘गोकुळ’मध्ये सहकार सप्ताह उत्साहात साजरा

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्यावतीने भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या आवाहनानुसार दि. २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित सहकार सप्ताह तसेच दि.४ जुलै रोजीचा आंतरराष्ट्रीय सहकार दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या “सहकारातून समृद्धी” या संकल्पनेला अनुसरून पर्यावरण संवर्धन, सहकाराची मूल्ये, कर्मचारी विकास आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविण्यात आले.
सहकार सप्ताहानिमित्त गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या प्रांगणात औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. गोकुळचे प्रशासक प्रदीप मालगावे व सागर बलकवडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. तसेच गोकुळचे प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव, गोगवे, बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी या शीतकरण केंद्र व सॅटेलाईट डेअरी उदगाव (शिरोळ), पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी तसेच कागल येथील प्रकल्प परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले.
सहकार सप्ताहानिमित्त संघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. अनिल कारंजकर यांचे “सहकार व्यवस्थापन व त्यापुढील आव्हाने” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. बदलत्या काळात सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने, प्रभावी व्यवस्थापन, संस्थेची कार्यपद्धती आणि कर्मचारी यांची भूमिका याविषयी त्यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
सहकार सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व उपक्रमांना अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वृक्षारोपण, मार्गदर्शनपर व्याख्यान या उपक्रमांच्या माध्यमातून सहकाराची मूल्ये अधिक बळकट करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला.
यावेळी संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेचे प्रा. डॉ. अनिल कारंजकर, आनंद यादव, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, संघाचे अधिकारी हिमांशू कापडिया, बाजीराव राणे, डॉ. दयावर्धन कामत, सुधाकर पाटील, डॉ. विजय मगरे, उदय पाटील, भरत मोळे, प्रताप पाटील, अमोल गडकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
6.7kmh
81 %
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page