कोल्हापूर :
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अँड फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट, तळसंदेच्या २२० विद्यार्थ्यांना नामांकित राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना सरासरी ३.५० लाख रुपये तर सर्वोच्च ८. ५० लाख रुपयांचे वार्षिक वेतन पॅकेज मिळाले असल्याची माहिती टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. सतीश पावसकर यांनी दिली.
डॉ. सतिश पावसकर म्हणाले की, विद्यार्थ्यांना दिलेले तांत्रिक ज्ञान, कोडिंग कौशल्ये आणि प्रोजेक्ट्सचे अनुभव त्यांना कॉर्पोरेट जगतात नक्कीच यश मिळवून देतात. या विद्यार्थ्यांनी स्वतःवर आत्मविश्वास बाळगला आणि आत्मविश्वासाने मुलाखतींना सामोरे गेले आणि आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवले.
ट्रेनींग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. शोएब तांबोळी यांनी सांगितले की, उद्योग-संस्था सहकार्य अधिक दृढ करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ट्रेनींग व प्लेसमेंट विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, संचालक डॉ सतीश पावसकर, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आर. एस. पोवार, डेप्युटी रजिस्ट्रार जितेंद्र पोवार, विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या २२० विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29
°
C
29
°
27.9
°
79 %
7.7kmh
75 %
Fri
29
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

