कोल्हापूर :
शाहू छत्रपती फाऊंडेशन, कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित राजर्षी शाहू आदर्श शिक्षक व विशेष उल्लेखनीय पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (दि.२८) संपन्न झाला. यामध्ये किसन वीर महाविद्यालय, वाई चे ग्रंथपाल प्रा. डॉ. शिवाजीराव कांबळे यांना शिक्षण, वाचनसंस्कृती संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि ज्ञानसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल “राजर्षी छत्रपती शाहू महाराज विशेष पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार इतिहास संशोधिका प्रा. डॉ. मंजुश्री पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारामुळे किसन वीर महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आली. प्रा. डॉ. कांबळे यांनी ग्रंथपाल म्हणून केवळ पुस्तके जपण्याचे कार्य न करता विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी, अभ्यासाभिमुख वातावरण घडवण्यासाठी आणि ज्ञानसंपन्न पिढी घडवण्यासाठी सातत्याने मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
याबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी प्रा. डॉ. कांबळे यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी आणि संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. याशिवाय किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनीही प्रा. डॉ. कांबळे यांचे अभिनंदन करून हा पुरस्कार महाविद्यालयासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
प्रा. डॉ. शिवाजी कांबळे यांना राजर्षी शाहू विशेष पुरस्कार
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29
°
C
29
°
28.9
°
79 %
6.2kmh
24 %
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

