Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंद कॉलेजमध्ये 'विवेक' या वार्षिक अंकाचे प्रकाशन

विवेकानंद कॉलेजमध्ये ‘विवेक’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन

कोल्हापूर :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद कॉलेज येथे महाविद्यालयीन नियतकालिक ‘विवेक’ (२०२५-२६) या वार्षिक अंकाचे प्रकाशन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य  अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, संपादक डॉ. एकनाथ आळवेकर, विभागीय संपादक, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, ज्ञानसंपदा आणि साहित्यिक जाणीव विकसित करण्यासाठी महाविद्यालयीन पातळीवर वार्षिक अंकाचे महत्त्व असल्याचे सांगितले. यातून लेखक, कवी निर्माण होतात. वार्षिक अंकात लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी डॉ. कविता तिवडे, डॉ. आरिफ महात, प्रा. डॉ. प्रदीप पाटील, प्रा. अशोक पाटील, प्रा. संतोष कुंडले, प्रा.डॉ. टेकचंद गोपाले, डॉ. एच. एस. नदाफ, डॉ. सुप्रिया पाटील उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
heavy intensity rain
28.6 ° C
28.6 °
28.6 °
82 %
9.7kmh
100 %
Thu
29 °
Fri
29 °
Sat
27 °
Sun
28 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page