Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या दोन विद्यार्थ्यांची गूगल स्टुडंट ॲम्बेसेडर म्हणून निवड

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या दोन विद्यार्थ्यांची गूगल स्टुडंट ॲम्बेसेडर म्हणून निवड

कोल्हापूर :
तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थी तेजस चौगुले आणि अतीफ पन्हाळकर यांची प्रतिष्ठित गुगल स्टुडंट ॲम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. नुकताच संस्थेचे विश्वस्त ऋतुराज संजय पाटील यांच्या हस्ते या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळवलेला हा सन्मान अभिमानस्पद असल्याचे सांगत ऋतुराज पाटील यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता,   टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. सतीश आर. पावसकर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील आदी उपस्थित होते.
ही निवड विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य, नाविन्यपूर्ण विचारसरणी, नेतृत्वगुण तसेच डिजिटल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन करण्यात आली आहे. गूगल स्टुडंट ॲम्बेसेडर हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, नवोपक्रम, नेतृत्व आणि जागतिक स्तरावरील तांत्रिक समुदायाशी जोडण्याची संधी उपलब्ध करून देणारा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक उपक्रम, प्रोजेक्ट्स, कार्यशाळा आणि सामाजिक माध्यमांद्वारे तंत्रज्ञान प्रसाराचे केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.
या विद्यार्थांना संचालक डॉ. सतीश आर. पावसकर, डीन अकॅडेमिक्स प्रा. राजेंद्र एस. पवार, आयक्यूएसी समन्वयक प्रा. केदार सहस्रबुद्धे, असिस्टट रजिस्ट्रार जे. ए. पवार यांच्यसह विभागप्रमुख, प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.5 ° C
28.5 °
28.5 °
83 %
9.7kmh
99 %
Wed
29 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page