• कृतज्ञता मेळावा व जाहीर सभा भव्य करणार : नाम. चंद्रकांतदादा पाटील
कोल्हापूर :
केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे २० जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी कोल्हापूरात अमित शहा यांची ‘धन्यवाद सभा’ होणार आहे. हा कृतज्ञता मेळावा व जाहीर सभा भव्य करणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या २० जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीची समन्वय बैठक आज भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी केंद्र सरकारमार्फत मंजूर झालेल्या १५०० कोटी रुपयांच्या निधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात येणारा कृतज्ञता मेळावा व जाहीर सभा भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीत मार्गदर्शन करताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून केंद्र सरकारने १५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमुळे मंदिर परिसराचा विकास, वारसा संवर्धन तसेच भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण होण्यास मोठी गती मिळणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कोल्हापूरकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सभेचे नियोजन, कार्यकर्त्यांची उपस्थिती, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, प्रसिद्धी तसेच विविध विभागांतील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे बूथ स्तरापर्यंत संपर्क अभियान राबवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही नाम. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी अमित शहा यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रमही जाहीर केला. त्यानुसार, १९ जून रोजी सायंकाळी अमित शहा यांचे कोल्हापूर येथे आगमन होणार असून शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा मुक्काम असेल. २० जून रोजी सकाळी श्री अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन मंदिर परिसर विकासकामांची पाहणी केल्यानंतर ते पोलीस ग्राउंड येथे आयोजित कृतज्ञता मेळावा व भव्य जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर इचलकरंजी येथे कलाप्पाणा आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थित राहून रात्री दिल्लीकडे रवाना होणार आहेत.
यावेळी नाम. हसन मुश्रीफ आणि आमदार राहुल आवाडे यांनी सहकार, बँकिंग आणि साखर उद्योगाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याची आवश्यकता व्यक्त केली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अंबाबाई मंदिरात भाविकांना सुलभ दर्शनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करून त्याचे सादरीकरण करण्याची सूचना केली. खासदार धनंजय महाडिक यांनी महायुतीतील सर्व घटक पक्षांचा समन्वय साधून कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येईल, असे सांगितले.
बैठकीस आमदार अशोक माने, प्रकाश आवाडे, राजेश क्षीरसागर, समरजितराजे घाटगे, महापौर रूपाराणी निकम, संजयकाका पाटील, चंद्रदीप नरके, विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, नाथाजी पाटील, समित कदम, महेश जाधव, सुजितभाऊ चव्हाण, प्रा. जयंत पाटील, अंबरीश घाटगे, मुरलीधार जाधव, राहुल चिकोडे, शिल्पा खोत, अक्षय जरग, भूषण पाटील, सावकर मादनाईक, विशाल शिराळे, संजय पाटील, स्वाती पाटील, शारंगधर देशमुख, सत्यजीत कदम, आदिल फरास, कौसर बागवान, अनिल डाळ्या यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २० जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर
Mumbai
overcast clouds
27.8
°
C
27.8
°
27.8
°
81 %
7.8kmh
94 %
Sun
28
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

