Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे...

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची सदिच्छा भेट

कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे तसेच फ्रान्सस्थित जागतिक दर्जाच्या डिझाईन व सर्जनशील शिक्षण संस्थेच्या भारतीय उपक्रमाचे प्रमुख आणि रुबिका इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनोज सिंह यांनी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान जागतिक शिक्षण, कौशल्य विकास, विद्यार्थी व प्राध्यापक आदान-प्रदान, संयुक्त संशोधन आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याच्या विविध संधींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
डॉ. देवानंद शिंदे व डॉ. मनोज सिंह यांचे कुलगुरू प्रा. (डॉ.) अनिलकुमार गुप्ता यांनी स्वागत केले. बैठकीदरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, बहुविषयक शिक्षण, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, उद्योजकता विकास, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या जागतिक स्पर्धात्मकतेसाठी आवश्यक कौशल्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः कृषी, अन्न तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, डिझाईन, डिजिटल तंत्रज्ञान आणि नवोपक्रम क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण व प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी परस्पर सहकार्याच्या शक्यता तपासण्यात आल्या.
रुबिका इंडिया आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ यांच्यामध्ये भविष्यात सामंजस्य करार करण्याबाबत प्राथमिक स्तरावर सकारात्मक विचारविनिमय झाला. या संभाव्य सहकार्याअंतर्गत विद्यार्थी व प्राध्यापक विनिमय कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप, संयुक्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम, जागतिक तज्ज्ञांची व्याख्याने, संशोधन प्रकल्प तसेच परदेशातील उच्च शिक्षण व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.
डॉ. मनोज सिंह यांनी विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाच्या संधी, डिझाईन थिंकिंग, सर्जनशीलता आणि नवोपक्रम यांचे महत्त्व पटवून देत जागतिक दर्जाच्या संस्थांशी सहकार्य वाढविण्याची गरज अधोरेखित केली. तर डॉ. देवानंद शिंदे यांनी उच्च शिक्षण संस्थांनी उद्योग, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी यांचा समन्वय साधून विद्यार्थ्यांना भविष्याभिमुख शिक्षण देण्याची आवश्यकता व्यक्त केली.
कुलगुरू प्रा. (डॉ.) अनिलकुमार गुप्ता यांनी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या धोरणाची माहिती देत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शिक्षण, संशोधन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी  कुलसचिव प्रा. (डॉ.) जयेंद्र ए. खोत, कॅम्पस संचालक प्रा. (डॉ.) सुहास एस. पाटील, फार्म ऑपरेशन्स प्रमुख इंजी. अमोल बी. गाताडे, मुख्य वित्त अधिकारी सुजित एस. सरनाईक, परीक्षा नियंत्रक डॉ. गुरुनाथ मोटे, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, संचालक, विभागप्रमुख तसेच प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
30 °
37 %
1.5kmh
29 %
Thu
30 °
Fri
30 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °

Most Popular

You cannot copy content of this page