Homeराजकियकरवीर तालुक्यातील ३ गावातील देवालयांना राज्य शासनाकडून ब वर्ग तिर्थक्षेत्राचादर्जा मंजुर

करवीर तालुक्यातील ३ गावातील देवालयांना राज्य शासनाकडून ब वर्ग तिर्थक्षेत्राचादर्जा मंजुर

• खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश
कोल्हापूर :
करवीर तालुक्यातील ३ गावातील देवालयांना असणारे ऐतिहासिक महत्व आणि भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून, राज्य शासनाने ३ मंदिरांना ब वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर केला आहे. त्यामध्ये करवीर तालुक्यातील दोनवडे येथील श्री जोतिर्लींग देवालय, बहिरेश्‍वर मधील श्रीकृष्ण मंदिर आणि खाटांगळे मधील विठ्ठलाई देवी मंदिराचा समावेश आहे.
या तीनही मंदिरांना अनेक वर्षांची परंपरा असून, वार्षिक यात्रेसह भाविकांची या मंदिरांमध्ये नियमित गर्दी असते. त्यामुळे या मंदिरांना ब वर्ग तिर्थक्षेत्रात समाविष्ट करावे, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली होती. त्याला यश येवून, या तीनही देवालयांना ब वर्ग दर्जा मिळाला आहे. याबाबतचा आदेश २४ मार्च २०२६ रोजी जाहीर झाला आहे.
खासदार महाडिक यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येवून, तीनही मंदिरांना ब वर्ग दर्जा मिळाल्याने, या मंदिरांचा विकास आणि विस्तार होवून, विविध पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच मंदिर विकासासाठी शासनाकडून निधीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मंदिर कमिटी, विश्‍वस्त आणि ग्रामस्थांकडून खासदार धनंजय महाडिक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होत आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
26 ° C
26 °
26 °
73 %
2.6kmh
75 %
Wed
26 °
Thu
28 °
Fri
27 °
Sat
27 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page