Homeशैक्षणिक - उद्योग एनआयटीत विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

एनआयटीत विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कोल्हापूर :
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), कोल्हापूर आणि श्रेयस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एनआयटीच्या अंतर्गत समिती व एनसीसी विभागाच्यावतीने विद्यार्थिनींसाठी डॉ. अमिता पतके यांचे एचपीव्ही लस व सर्वांगीण स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन सत्र आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबीराचा लाभ २५७ विद्यार्थिनींनी घेतला.
शिबीरात श्रेयस मल्टीस्पेशालिटी टीमकडून विद्यार्थिनींचा रक्तदाब, बीएमआय व बीएसएल तपासून त्यानुसार प्रत्येक विद्यार्थिनीला तज्ज्ञांकडून आरोग्य सल्ला देण्यात आला. अंतर्गत समितीच्या पीठासन अधिकारी प्रा. प्राजक्ता पाटील व एनसीसीच्या सीटीओ प्रा. माधुरी पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. या उपक्रमासाठी संचालक डॉ. संजय दाभोळे यांचे मार्गदर्शन तर अधिष्ठाता प्रा. बाजीराव राजीगरे यांचे सहकार्य लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
33 ° C
33 °
33 °
66 %
4.6kmh
40 %
Mon
32 °
Tue
31 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
31 °

Most Popular

You cannot copy content of this page