Homeकला - क्रीडामिशन लक्षवेध अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी खेळाडूंची निवड चाचणी

मिशन लक्षवेध अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी खेळाडूंची निवड चाचणी

कोल्हापूर :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा प्रतिभावान खेळाडूंसाठी जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्राकरिता निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य शासनाचा उद्देश ऑलिम्पिक स्तरावरील १२ क्रीडा प्रकारांमध्ये गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविणे हा असून या योजनेतून क्रीडा प्रशिक्षण, पायाभूत सुविधा, स्पर्धा आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, प्रोत्साहन व करिअर मार्गदर्शन अशा विविध घटकांचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. ही योजना त्रिस्तरीय असून राज्यस्तरावर हाय परफॉर्मन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर आणि जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात कुस्ती, मैदानी खेळ, वेटलिफ्टिंग, हॉकी आणि रायफल शूटिंग या पाच क्रीडा प्रकारांमध्ये प्रत्येकी २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्राच्या माध्यमातुन कुस्ती, मैदानी, वेटलिफ्टींग, हॉकी व रायफल शुटिंग या खेळाकरीता निवड चाचणीचे आयोजन करणे प्रस्तावित आहे. राज्यातील पात्र व गुणवत्ता प्राप्त खेळाडूंना संबंधित खेळामध्ये प्रगत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ही केंद्रे कार्यान्वीत करण्यात येत आहेत.
खेळाडूचे वय ३१ डिसेंबरपर्यंत २१ वर्षांखालील असावे. अर्जासोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, पासपोर्ट साईज तीन फोटो, बोनाफाईड प्रमाणपत्र व पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. क्रीडा स्पर्धेतील किमान कामगिरी राज्य स्तरावरील सहभाग किंवा पदक प्राप्त खेळाडू, (शालेय /संघटना अधिकृत स्पर्धा) गत २ वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक राहील.
वरील निकष पूर्ण करणाऱ्या खेळाडूंची निवड तज्ञ समितीव्दारे करण्यात येणार असून ही प्रक्रीया अनिवासी राहिल. त्यांचा पुरक आहार, गणवेश, क्रीडा साहित्य, राष्ट्रीय व विदेशी स्पर्धा प्रवास खर्च, प्रशिक्षक / मार्गदर्शक, वैद्यकीय उपचार, विमा आणि प्रशिक्षणाचा संपुर्ण खर्च योजनेंतर्गत केला जाणार आहे. निवड चाचणी आयोजन समिती प्रमुख अजिंक्य चौगले, सहाय्यक क्रीडा विकास अधिकारी, मो.९१५८५८७७७२ हे राहतील.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
3.1kmh
11 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page