Homeसामाजिकपावनखिंड परिसरात 'मेरा युवा भारत'तर्फे स्वच्छता श्रमदान

पावनखिंड परिसरात ‘मेरा युवा भारत’तर्फे स्वच्छता श्रमदान

कोल्हापूर :
शहीद दिनाचे औचित्य साधत युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat) कोल्हापूरच्या वतीने ऐतिहासिक पावनखिंड परिसरात ‘स्वच्छता श्रमदान’ उपक्रम उत्साहात पार पडला. या मोहिमेद्वारे तरुणांनी ऐतिहासिक वारसा स्थळांच्या जतन आणि स्वच्छतेचा संदेश दिला.
क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक युवक- युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पावनखिंड परिसरातील प्लास्टिक कचरा, निर्माल्य आणि अन्य कचरा गोळा करून संपूर्ण परिसर चकाचक करण्यात आला. केवळ स्वच्छताच नव्हे, तर ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य राखण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या विशेष मोहिमेसाठी जिल्हा युवा अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी शिस्तबद्ध पद्धतीने हे श्रमदान पूर्ण केले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी समन्वयक निलेश कांबळे आणि संकेत गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
26.9 °
83 %
7.2kmh
7 %
Fri
30 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page