Homeकला - क्रीडाखंडोबा उपांत्य फेरीत

खंडोबा उपांत्य फेरीत

कोल्हापूर :
चुरशीने झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळने संयुक्त जुना बुधवार पेठवर ३-० गोलने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. खंडोबाच्या पृथ्वीराज साळोखेला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. गतवेळच्या विजेत्या खंडोबाने विजयाला गवसणी घालत जुना बुधवारचे आव्हान संपुष्टात आणले.
बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. सोमवारी खंडोबा आणि जुना बुधवार या गतवेळच्या विजेत्या आणि उपविजेत्या संघात सामना झाला. दोन्ही संघाकडून गोलची आघाडी घेण्यासाठी वेगवान खेळ झाला पण त्यांना यश मिळाले नाही. पूर्वार्धातील ४० मिनिटे गोलफलक कोराच राहिला. जादावेळेत ४८व्या मिनिटाला प्रथमेश गावडेने दिलेल्या पासवर प्रभू पोवारने गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. दरम्यान, जुना बुधवारच्या संकेत जाधवने खंडोबाचा खेळाडू शाहिर एस. याला धोकादायकरित्या रोखल्याने मुख्यपंच अजिंक्य गुजर यांनी संकेतला रेडकार्ड दाखविले. यामुळे जुना बुधवारचा संघ १८व्या मिनिटांपासून १० खेळाडूंसह मैदानात खेळत होता.
उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यासाठी जुना बुधवारच्या तेजस एस., मयूर सुतार, प्रथमेश जाधव, शुभम जाधव, पॅट्रिक मस्करेन्हस यांनी खोलवर चढाया केल्या. यामध्ये ते समन्वयाअभावी गोल करण्यात अयशस्वी ठरले. खंडोबाकडून पृथ्वीराज साळोखेने चौफेर खेळ केला. एका चढाईत गोलक्षेत्रात उडालेल्या गोंधळात पृथ्वीराज साळोखेने मिळालेल्या संधीचा लाभ उठवत गोल नोंदवून संघाला २-०ने आघाडीवर नेले. ६३व्या मिनिटाला झालेल्या या गोलनंतर जादावेळेत ८३व्या मिनिटास बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या विनायक पाटीलने गोल केला. विष्णू टी.एम. च्या पासवर गोल होऊन आघाडी ३-० अशी झाली. अखेर उर्वरित वेळेत हिच आघाडी राखत खंडोबाने वाजय मिळवला.
——————————————————-
  आजचा सामना….
• बालगोपाल – सम्राटनगर : दुपारी ४ वाजता

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
26.9 °
83 %
7.2kmh
7 %
Fri
30 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page