कोल्हापूर:
‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. या यात्रेच्या निमित्ताने डोंगरावर येणाऱ्या लाखो भाविकांना स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण मिळावे, तसेच ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे, या उदात्त हेतूने रविवारी (दि. २२) जोतिबा डोंगरावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
ही स्वच्छता मोहीम सहजसेवा ट्रस्ट यांच्या सहकार्याने आणि शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच, समिट अँडव्हेन्चर, लाईव्ह अँडव्हेन्चर, तसेच हिल रायडर्स ॲडव्हेंचर फौन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत राबवलेल्या या मोहिमेत तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
जोतिबा डोंगरावरावरील उत्तर दरवाजा कमानीच्या चारही बाजूंना मोठ्या प्रमाणात रानटी झुडपे वाढली होती. ही कमान उंच आणि दुर्गम भागात असल्याने, तिथे पोहोचणे कठीण होते. मात्र, हिल रायडर्स, समिट आणि लाईव्ह अँडव्हेन्चरच्या अनुभवी गिर्यारोहकांनी दोर (रोप्स) आणि गिर्यारोहण तंत्राचा वापर करून उंचावरील झुडपे मुळासकट काढून टाकली.
शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या मुला-मुलींनी कमानीवरील गवत आणि इतर कचरा साफ करून परिसर चकाचक केला. विशेष म्हणजे, शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचचे मार्गदर्शक कै. सुरज ढोली यांनी सुरू केलेली ही सेवाभावी परंपरा त्यांच्या शिष्यांनी तितक्याच निष्ठेने पुढे सुरू ठेवली आहे.
जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वी झाले. या मोहिमेत मोठ्या संख्येने शिवभक्त आणि सेवाभावी नागरिक सहभागी झाले होते. या सर्वांच्या सामूहिक श्रमातून जोतिबाचा उत्तर दरवाजा परिसर यात्रेसाठी सज्ज झाला असून, भाविकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
——————————
जोतिबा डोंगरावरील उत्तर दरवाजा कमान परिसरात स्वच्छता मोहीम
Mumbai
light rain
28
°
C
28
°
26.9
°
83 %
7.2kmh
7 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°

