कोल्हापूर :
पूर्वार्धात पिछाडीवर असलेल्या दिलबहार तालीम मंडळने उत्तरार्धात आघाडी घेत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळवर २ विरूध्द १ गोलने मात करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दिलबहारच्या थांगजालेन हाओकिपला सामवीर म्हणून गौरविण्यात आले.
बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. रविवारी दिलबहार आणि फुलेवाडी संघादरम्यान सामना झाला. दोन्ही संघाकडून गोलची आघाडी घेण्यासाठी वेगवान खेळ झाला पण त्यांना यश मिळाले नाही. पूर्वार्धातील अर्धा तास गोलफलक कोरा राहिला. ३४व्या मिनिटाला लेनिन याने दिलेल्या पासवर मारुती कोळीने गोल करून फुलेवाडीला महत्वपूर्ण १-० अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात गोलची परतफेड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या दिलबहारच्या थांगजालेन हाओकिप, स्वयंम साळोखे, प्रथम भोसले, गंधर्व घाटगे, फेबिन गिब्स यांनी खोलवर चढाया केल्या. एका चढाईत थांगजालेन हाओकिपने मिळालेल्या संधीचा लाभ उठवत गोल नोंदवून संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. लगेचच ६०व्या मिनिटाला झालेल्या चढाईत स्वयंम गिराजीच्या पासवर गंधर्व घाटगेने गोल करून संघाला २-१ने आघाडीवर नेले. फुलेवाडीच्या मारूती कोळी, अक्षय पाटील, सत्येन पाटील, लेनिन, दिग्विजय सुतार, सिध्दार्थ पाटील, आयुष पाटील यांनी गोलसाठी वेगवान चाली रचल्या परंतु दिशाहीन फटके व समन्वयाचा अभाव यामुळे त्यांना गोल करण्यात यश आले नाही. अखेर उर्वरित वेळेत २-१ची आघाडी राखत दिलबहारने सामना जिंकला.
——————————
• खंडोबा – जुना बुधवार : दुपारी ४ वाजता
दिलबहारची उपांत्य फेरीत धडक
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
31.2
°
C
31.2
°
31.2
°
73 %
6.8kmh
91 %
Thu
31
°
Fri
31
°
Sat
31
°
Sun
31
°
Mon
31
°

