Homeराजकियकृष्णराज महाडिक यांनी घेतली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट

कृष्णराज महाडिक यांनी घेतली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट

कोल्हापूर :
भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांची भेट घेतली.
पक्ष संघटन, युवकांचे प्रश्‍न, संघटनात्मक रचना याबद्दल कृष्णराज यांनी या वरिष्ठ नेत्यांकडून माहिती घेतली. तसेच युवा मोर्चाची वाटचाल कशा पध्दतीने असावी, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन घेतले.
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी दुसर्‍या दिवसापासून संघटनेच्या कामकाजाला सुरवात केली.
गेल्या तीन दिवसांपासून कृष्णराज महाडिक नवी दिल्लीत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांची कृष्णराज यांनी भेट घेतली. त्यांच्याकडून कृष्णराज महाडिक यांनी विविध विषयांवर माहिती जाणून घेतली. युवा वर्गाचे प्रश्‍न, पक्षीय संघटन, युवकांच्या अपेक्षा, भाजपची विचारधारा आणि युवा मोर्चाचा विस्तार या अनुषंगाने कृष्णराज महाडिक यांनी भाजपच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांकडून मार्गदर्शन घेतले. जास्तीत जास्त युवकांना भाजपचे सदस्यत्व देणे, युवापिढीसाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करणे, यासह अनेक मुद्दयांवर कृष्णराज यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चा अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांच्याशी चर्चा केली. कृष्णराज यांच्या निवडीबद्दल तसेच भविष्यकालीन वाटचालीसाठी भाजपच्या दोन्ही नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
30.2 ° C
30.2 °
30.2 °
65 %
4.5kmh
98 %
Sat
31 °
Sun
31 °
Mon
30 °
Tue
29 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page