Homeशैक्षणिक - उद्योग डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या पाच माजी विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यश

डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या पाच माजी विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यश

कोल्हापूर :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग व आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेमध्ये डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदेच्या पाच माजी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये  महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सोमनाथ भरमा चौगुले याने पोलिस उप निरीक्षक या पदाला गवसणी घातली. तसेच विविध बँकेच्या स्पर्धा परिक्षेमधून अभिनव खोत (पीओ, साऊथ इंडियन बँक), मोहिनी निकम (ज्युनियर असोसिएट, बँक ऑफ इंडिया), शिफाखान पठाण (ग्राहक सेवा सहयोगी, पंजाब सिंध बँक) व समृद्धी पाटील (ग्राहक सेवा सहयोगी, यूनियन बँक ऑफ इंडिया) यांची निवड झाली आहे.
माजी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार यांनी त्यांचे अभिनंदन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
————————————————————

RELATED ARTICLES
Mumbai
haze
29 ° C
29 °
29 °
79 %
1.5kmh
40 %
Sat
30 °
Sun
30 °
Mon
30 °
Tue
30 °
Wed
30 °

Most Popular

You cannot copy content of this page