Homeशैक्षणिक - उद्योग आत्मविश्वास व सकारात्मकता हीच यशाची गुरुकिल्ली : उर्मिला शुभंकर

आत्मविश्वास व सकारात्मकता हीच यशाची गुरुकिल्ली : उर्मिला शुभंकर

• डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात
कोल्हापूर :
महिलांनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवला, सकारात्मक विचारसरणी अंगीकारली आणि भावनांचे योग्य व्यवस्थापन केले, तर कोणतेही आव्हान पार करून त्या यशस्वी होऊ शकतात असे प्रतिपादन समुपदेशक आणि मानसशास्त्रज्ञ सौ. उर्मिला शुभंकर यांनी केले. डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण समितीच्यावतीने ‘येस…. आय ॲम एम्पावर्ड’ या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले.
सौ. उर्मिला शुभंकर यांनी महिलांच्या भावनिक स्वास्थ्याचे महत्त्व, आत्मविश्वास वाढविण्याच्या पद्धती, तणाव व्यवस्थापन, सकारात्मक विचारसरणी, स्वतःची ओळख निर्माण करणे तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल राखण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. भीती, न्यूनगंड आणि मानसिक तणाव यांवर मात करून स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थिनींना दिला.
कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत म्हणाले, शिक्षण, आत्मविश्वास, मानसिक बळकटी आणि समाजातील सक्रिय सहभाग यांमुळे महिलांचे सक्षमीकरण होते. महिलांनी आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून प्रगतीच्या दिशेने पुढे जावे.
महिला सक्षमीकरण समितीच्या अध्यक्षा डॉ. मंगल ए. पाटील यानी प्रास्ताविक केले. सदस्य सचिव डॉ. विद्या बडदारे यांनी आभार मानले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, प्र- कुलपती ऋतुराज संजय पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विद्यापीठातील सर्व महिला प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
————————————————————

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
80 %
8kmh
100 %
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page