Homeकला - क्रीडासंकेत साळोखेची हॅटट्रिक अन् 'शिवाजी'चा उपांत्य फेरीत प्रवेश

संकेत साळोखेची हॅटट्रिक अन् ‘शिवाजी’चा उपांत्य फेरीत प्रवेश

कोल्हापूर :
संकेत नितीन साळोखेने नोंदवलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळने प्रॅक्टीस फुटबॉल क्लबवर ३ विरूध्द १ गोलने मात करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्पर्धेत पहिली हॅटट्रिक नोंदवण्यात यशस्वी ठरलेला संकेत साळोखे सामनावीर ठरला.
संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था आयोजित राजेश चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. बुधवारी शिवाजी आणि प्रॅक्टीस क्लब यांच्यातील सामना चुरशीचा झाला. पूर्वार्धात ‘शिवाजी’कडून झालेल्या चढाईत हर्ष जरगने दिलेल्या पासवर संकेत नितीन साळोखेने हेडव्दारा गोल नोंदवून संघाला आघाडीवर नेले. ६व्या मिनिटास मिळालेल्या १-०च्या आघाडीनंतर २७व्या मिनिटाला इंद्रजीत चौगुलेच्या पासवर संकेतने वैयक्तिक तसेच संघाचाही दुसरा गोल नोंदवून आघाडी भक्कम केली. गोलची परतफेड करण्यासाठी प्रॅक्टीस क्लबकडून झालेल्या चढाईत केवल कांबळेने दिलेल्या पासवर सुजित एस.ने गोल नोंदवून आघाडी २-१ वर आणली. ३१व्या मिनिटाला झालेल्या या गोलनंतर दोन्ही संघाकडून झालेल्या चढाया व्यर्थ ठरल्या. पूर्वार्धात ‘शिवाजी’चा संघ २-१ ने आघाडीवर होता.
उत्तरार्धात दोन्ही संघाकडून वेगवान खेळ झाला. ‘शिवाजी’कडून संकेत नितीन साळोखे, हर्ष जरग, दर्शन पाटील, यश जांभळे, इंद्रजीत चौगुले, संकेत अनिल साळोखे यांनी खोलवर चाली रचल्या. त्यामध्ये ६६व्या मिनिटाला यश आले. संकेत अनिल साळोखेने दिलेल्या पासवर संकेत नितीन साळोखेने मैदानी गोल नोंदवून हॅटट्रिक साधून संघाची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. प्रॅक्टीसकडून सूरज जाधव, अजिंक्य नलवडे, सुजित एस., साहिल डाकवे, केवल कांबळे, सचिन गायकवाड, आकाश बावकर यांनी गोलची आघाडी कमी करण्यासाठी रचलेल्या चाली अयशस्वी ठरल्या. अखेरपर्यंत त्यांनी गोलसाठी अटोकाट प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. अखेर उर्वरित वेळेत ३-१ची आघाडी राखत ‘शिवाजी’ने सामना जिंकला.
——————————————————-
  आजचा सामना…
• पाटाकडील – दिलबहार : दुपारी ४ वाजता
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
81 %
8.1kmh
100 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page