कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत डी. वाय. पाटील कॉलेज, साळोखेनगर येथे घेण्यात आलेल्या आंतर विभागीय तायक्वांदो महिला व पुरुष स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयाची बी. ए .भाग ३ मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी श्रेया विश्वास बराले हिने ४६ किलो खालील वजनी गटात सुवर्ण पदक मिळवून ओडीसा येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी तायक्वांदो स्पर्धेमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीच्या संघात स्थान निश्चित केले.
या यशाबद्दल श्रेया बराले हिला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच विवेकानंद कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी, जिमखाना विभागप्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, रजिस्ट्रार एस. के. धनवडे, सुरेश चरापले तसेच श्रेयाच्या आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंदच्या श्रेया बरालेची ऑल इंडिया तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.8
°
C
28.8
°
28.8
°
76 %
8kmh
99 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°

