कोल्हापूर :
महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यापीठातील शैक्षणिक, संशोधन व कौशल्यविकास उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला.
विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष संजय घोडावत यांनी विकास खारगे यांचे स्वागत केले. यावेळी विद्यापीठातील अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे, स्टार्टअप इन्क्युबेशन सेल तसेच विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमांची त्यांना माहिती देण्यात आली.
याप्रसंगी श्री. खारगे यांनी परदेशी विद्यापीठातील तज्ञ प्राध्यापकांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करून संशोधन क्षेत्रात अधिक कार्य करण्याची सूचना केली.
तसेच विद्यापीठातील उद्योगसहभाग, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांना त्यांनी प्रशंसनीय म्हटले. राज्याच्या शैक्षणिक प्रगतीत अशा खाजगी विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. स्पर्धात्मक युगात कौशल्यविकास, संशोधनवृत्ती आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. ज्ञान, कौशल्य आणि चारित्र्य यांचा संगम साधणारे विद्यार्थीच देशाच्या प्रगतीचे खरे शिल्पकार ठरतात, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या भेटी दरम्यान संजय घोडावत विद्यापीठाचे ट्रस्टी व गव्हर्निंग कौन्सिल मेंबर विनायक भोसले,
अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची घोडावत विद्यापीठाला सदिच्छा भेट
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
34
°
C
34
°
30.9
°
52 %
3.1kmh
40 %
Tue
33
°
Wed
31
°
Thu
31
°
Fri
31
°
Sat
33
°

